Homeक्राइमAdani Bribery Case : अदानी लाचप्रकरणात नवे अपडेट, अमेरिकेच्या कोर्टाने घेतला हा...

Adani Bribery Case : अदानी लाचप्रकरणात नवे अपडेट, अमेरिकेच्या कोर्टाने घेतला हा निर्णय

Subscribe

अमेरिका विरुद्ध अदानी आणि इतर (अदानी विरुद्ध फौजदारी खटला), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन विरुद्ध अदानी आणि इतर (अदानी विरुद्ध दिवाणी खटला) आणि एसईसी विरुद्ध कॅबनेस (इतर आरोपींविरुद्ध दिवाणी खटला) यांचा या प्रकरणांमध्ये समावेश आहे.

(Adani Bribery Case) वॉशिंग्टन : हिंडेनबर्ग प्रकरणानंतर प्रसिद्ध भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाच तसेच गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केला आहे. अमेरिकन कोर्टाने आता संबंधित सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते. तथापि, अदानी समूहाने या आरोपांचा इन्कार केला आहे. (Joint hearing of Adani bribery cases to be held in US court)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदानी आणि इतरांविरुद्धचा खटला एकत्रित करण्याचे आदेश न्यूयॉर्क कोर्टाने दिले आहेत. सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. वस्तुत:, सर्व प्रकरणातील आरोप आणि व्यवहार सारखेच असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Avinash Jadhav : …तेव्हा तुम्हाला राज ठाकरेंची किंमत कळेल, मुंब्रा घटनेमुळे अविनाश जाधव संतापले

अमेरिका विरुद्ध अदानी आणि इतर (अदानी विरुद्ध फौजदारी खटला), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन विरुद्ध अदानी आणि इतर (अदानी विरुद्ध दिवाणी खटला) आणि एसईसी विरुद्ध कॅबनेस (इतर आरोपींविरुद्ध दिवाणी खटला) यांचा या प्रकरणांमध्ये समावेश आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सुसूत्रता ठेवण्यासाठी करण्यासाठी तसेच केस शेड्यूलिंग करताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

- Advertisement -

हे सर्व खटले जिल्हा न्यायाधीश निकोलस जी. गॅरोफिस यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. अदानी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या गुन्हेगारी खटलेही न्यायमूर्ती गॅरोफिर यांच्याकडेच आहेत. सध्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांना याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

हेही वाचा – Bhujbal and Fadnavis : भुजबळ – फडणवीसांचे तुझ्या गळा माझ्या गळा, सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमात परस्परांवर स्तुतीसुमने

अदानी आणि इतरांवर सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी 2 हजार 29 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. तथापि, हे आरोप निराधार असल्याचे सांगत अदानी समूहाने ते फेटाळले आहेत. आम्ही कायद्याचे पालन करणारी संस्था आहोत, असे अदानी समूहाने म्हटले आहे.

काँग्रेसचा अदानींसह मोदींवर निशाणा

अदानी यांचे कथित लाचखोरीचे प्रकरण समोर येताच काँग्रेसने अदानी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी हे अदानी यांचे एजंट असल्याप्रमाणे काम करतात, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. मोदी विदेशात जातात आणि त्यानंतर काही दिवसांतच त्या देशातील कंत्राटे अदानी यांना मिळतात, असा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच, या लाचप्रकरणी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्याची मागणीही काँग्रेसने केली होती. (Adani Bribery Case: Joint hearing of Adani bribery cases to be held in US court)

हेही वाचा – Jitendra Awhad : एखाद्याला उचलून न्यायचे आणि थेट गायबच करायचे… काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

Manoj Joshi
Manoj Joshi
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -