मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आणि आता प्रतिक्षा आहे निकालाची. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात अदानी चर्चेत आले. महायुती मुंबई आणि धारावी अदानी यांना देण्याचा घाट घालत असल्याचा आरोप केला. अचानक विधानसभा निवडणुकीमध्ये अदानी हा मुद्दा चर्चेला आला. दरम्यान अदानी महाराष्ट्रात चर्चेत आले असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेत आले आहेत.
अदानी उद्योग समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर लाचखोरी आणि अब्जावधींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने या फसवणूक प्रकरणी अदानींवर, त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. यामुळे अदानी उद्योग समुहाला मोठा धक्का बसला आहे. त्यासोबतच अदानी उद्योग समुहाचा एक आंतरराष्ट्रीय करार देखील रद्द झाला आहे. केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी या संबंधीची घोषणा केली.
केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी त्यांच्या देशातील मुख्य विमानतळाचा विस्तार करण्याची योजना रद्द केली आहे. या कामासाठी भारतीय उद्योगपती अदानींनी सर्वाधिक बोली लावली होती. रुटो यांनी अदानींसोबतचा 700 डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीचा करार रद्द केला आहे.
अदानींवर कोणता आरोप ?
भारतातील सौरऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना २३५ दशलक्ष डॉलर्स लाच दिल्याचा आरोप आहे. अदानी यांच्यावरील कारवाई नंतर देशातील उद्योग आणि त्यांचे शेअर्स याबद्दल बोलका येते.
Edited by – Unmesh Khandale