घरदेश-विदेशGautam Adani : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 15 व्या...

Gautam Adani : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 15 व्या क्रमांकावर

Subscribe

Gautam Adani : गेल्या काही दिवस भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली. अदानी समूहाच्या शेअर्सनी उंच भरारी घेतली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सर्वात अधिक कामाई करणारे व्यक्त ठकले आहेत. अदानी समूहाच्या संपत्तीत एका दिवसात 12.3 अब्ज डॉलर ने वाढ झाली आहे. अदानी एका दिवसात सर्वाधिक कमाईच्या करण्याच्या बाबतीत नंबर एक अब्जाधीश बनले आहेत.

त्यांची आता 82.5 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. मंगळवारी अदानीने कमाईच्या बाबतीत इतर सर्व श्रीमंतांना मागे टाकले. श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानींपेक्षा फक्त दोन स्थानांनी मागे आहे. या यादीत अंबानी 13 व्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 91.4 अब्ज डॉलर आहे. आशियामध्ये अंबानी पहिल्या तर अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आता दोघांच्या संपत्तीत केवळ ८.९ अब्ज डॉलर्सचा फरक आहे. तर जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये 15 व्या स्थानावर पोहचले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा…. अदानी ग्रुपवर आर्थिक संकट, मग आता धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचं काय? वाचा सविस्तर 

मंगळवारी अदानींनी कमाईच्या बाबतीत इतर सर्व श्रीमंतांना मागे टाकले. मुकेश अंबानी यांच्या दोन स्थानांनी मागे आहेत. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत 13 व्या क्रमांकावर आहेत. तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 91.4 अब्ज डॉलर आहे.

- Advertisement -

मुकेश अंबानी आशियामध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत तर अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांच्या संपत्तीमध्ये 8.9 अब्ज डॉलर्सचा फरक आहे. अंबीनींच्या एकूण संपत्तीत 4.33 अब्ज डॉलरने वाढली. तर आदानींच्या एकून संपत्तीत 38 अब्ज डॉलरची घट झाली.

 

कोण प्रथम क्रमांकावर आहे

जगातील श्रीमंतांच्या यादीत इलॉन मस्क 222 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. मंगळवारी त्यांची एकूण संपत्ती २.२५ अब्ज डॉलरने वाढली. Amazon चे संस्थापक जेफ बेझोस या यादीत 171 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट ($169 अब्ज), बिल गेट्स ($134 अब्ज) चौथ्या, लॅरी एलिसन ($129 अब्ज) पाचव्या, स्टीव्ह बाल्मर ($129 अब्ज) सहाव्या, वॉरेन बफे ($119 अब्ज) सातव्या, लॅरी पेज ($119 अब्ज डॉलर) आठव्या स्थानावर आहेत. मार्क झुकेरबर्ग ($115 अब्ज) नवव्या स्थानावर आणि सर्गे ब्रिन ($113 अब्ज) दहाव्या स्थानावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -