FPO रद्द केल्यानंतर गौतम अदानींचे व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण, म्हणाले…

उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समुहाने काढलेला FPO रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेअर बाजारातील चढ-उतार पाहता कंपनीच्या संचालक मंडळाने FPO रद्द केला आहे.

Gautam Adani will soon enter the list of top 20 rich people

उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समुहाने काढलेला FPO रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेअर बाजारातील चढ-उतार पाहता कंपनीच्या संचालक मंडळाने FPO रद्द केला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपले मत स्पष्ट केले. (Adani Group Chairman Gautam Adani video After taking the decision to cancel the FPO)

“FPO रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याे अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. पण आज बाजारातील अस्थिरता लक्षात पाहता FPO बरोबर पुढे जाणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही असे बोर्डाला ठामपणे वाटलं. माझ्यासाठी, माझ्या गुंतवणूकदारांचे हित सर्वप्रथम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना संभाव्य तोट्यापासून वाचवण्यासाठी आम्ही FPO मागे घेतला आहे. या निर्णयाचा आमच्या विद्यमान कार्यांवर आणि भविष्यातील योजनांवर परिणाम होणार नाही. आम्ही वेळेवर अंमलबजावणीवर लक्ष देत राहू. आम्ही FPOमधून मिळालेली रक्कम परत करणार आहोत. तसेच, त्याच्याशी संबंधित व्यवहार पुर्ण करणार आहोत. बाजार स्थिर झाल्यावर आम्ही आमच्या भांडवली बाजार धोरणाचे पुनरावलोकन करू. आम्ही ईएसजीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे आणि आमचा प्रत्येक व्यवसाय जबाबदारीने मूल्य निर्माण करत राहील”, असे गौतम अदानी यांनी सांगितले.

अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २८.४५ टक्क्यांनी घसरला आणि ८४६.३० रुपयांच्या तोट्यासह २१२८.७० रुपयांवर बंद झाला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप ९६,४७८.२९ कोटी रुपयांनी कमी झाले. कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसापूर्वी ३,३९,१५०.३३ कोटी रुपये होते, ते आज २,४२,६७२.०४ कोटी रुपयांवर आले आहे.

हिंडेनबर्गने नुकताच हा अहवाल प्रकाशित केला. अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंगच्या फसवणुकीच्या नियोजनात गुंतलेला आहे. फर्मने अहवालात दावा केला आहे की त्यांनी समूहाच्या माजी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डझनभर व्यक्तींशी बोलले आहेत. हजारो दस्तऐवजांची समिक्षा केली आहे आणि सुमारे अर्धा डझन देशांमध्ये उद्योगांच्या साइटला भेट देण्यात आली आहे.


हेही वाचा – निवडणुकीच्या तिकिटाचे आमिष दाखवून दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाची फसवणूक