घरताज्या घडामोडी'गोरे लोक भारताची प्रगती...', अदानी समूहासाठी भारताचा 'हा' माजी खेळाडू मैदानात

‘गोरे लोक भारताची प्रगती…’, अदानी समूहासाठी भारताचा ‘हा’ माजी खेळाडू मैदानात

Subscribe

अमेरिकास्थित हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुदाचे शेअर्स कोसळण्यास सुरुवात झाली. मागील आठवड्यापासून एका व्यावसायिक समूहाच्या शेअर्सच्या किमतीत चढ-उतार दिसत आहे.

अमेरिकास्थित हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुदाचे शेअर्स कोसळण्यास सुरुवात झाली. मागील आठवड्यापासून एका व्यावसायिक समूहाच्या शेअर्सच्या किमतीत चढ-उतार दिसत आहे. एकीकडे हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहावर आर्थिक संकट ओढावले असताना, दुसरीकडे मात्र भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग अदानी समुहासाठी मैदानात उतरला आहे. अदानी समूहातील घसरणीसंदर्भात हिंडेनबर्गवर विरेद्र सेहवाग याने हल्लाबोल केला आहे. (adani group hindenburg report former team india captain virender sehwag tweets they cant see our progress)

माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग याने ट्विटरच्या माध्यमातून हिंडेनबर्गवर हल्लाबोल केला आहे. “गोरे लोक भारताची प्रगती सहन करू शकत नाहीत, असे नाव न घेता तो म्हणाला. एवढेच नाही तर त्यांने या संपूर्ण प्रकरणाला सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे. भारताची प्रगती गोर्‍या लोकांना सहन होत नाही. अशाप्रकारे भारतीय बाजारपेठेची पडझड हे एक चतुराईने रचलेले षडयंत्र दिसते. आपण कितीही प्रयत्न केले तरी भारत नेहमीप्रमाणेच मजबूत राहून यातून बाहेर पडेल”, असे ट्वीट विरेंद्र सहवाग याने केले आहे.

- Advertisement -

विरेंद्र सेहवागचे हे ट्वीट काही वेळातच व्हायरल झाले असून, त्यावर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्याच्या या ट्वीटला सहमतीही दर्शनवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे. याच चढ-उतारीवरून आता भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) मोठं वक्तव्य केले आहे. ‘मागील आठवडाभरात एका व्यावसायिक समूहाच्या वैयक्तिक समभागांच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार झालेत. त्यामुळे आम्ही बाजाराची अखंडता सुनिश्चित करण्यासाठी, बाजारांना पारदर्शकता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी वचनबद्ध आहोत’, असे सेबीने म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – अदानी समूहाच्या प्रकरणावर ‘सेबी’ची प्रतिक्रिया; ‘हे’ निवेदन जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -