घरदेश-विदेशदेशाच्या महत्वकांक्षेवर हा नियोजित हल्ला; हिंडनबर्गच्या 'त्या' आरोपांना अदानी ग्रुपकडून प्रत्युत्तर

देशाच्या महत्वकांक्षेवर हा नियोजित हल्ला; हिंडनबर्गच्या ‘त्या’ आरोपांना अदानी ग्रुपकडून प्रत्युत्तर

Subscribe

अमेरिकेची फॉरेन्सिक फायनान्शियल कंपनी हिंडनबर्गने नुकतचं एका रिसर्चमधून अदानी ग्रुपवर सामाजिक फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉडमध्ये गुंतल्याचे अनेक गंभीर आरोप केले. मात्र अदानी ग्रुपने हे आरोप फेटाळून लावत हा रिपोर्ट विशिष्ट ग्रुपला बदनाम करण्याच्या हेतूने तयार केल्याचं म्हटलं आहे. अदानी ग्रुप यासंदर्भात रविवारी एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. 413 पानांच्या या निवेदनातून अदानी ग्रुपने हिंडनबर्गच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. हिंडनबर्गने केलेले आरोप म्हणजे देशाच्या महत्वकांक्षेवर केलेला नियोजित हल्ला असल्याचं मत अदानी ग्रुपने मांडलं आहे. मात्र हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टमुळे अदानी ग्रुपच्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

हिंडनबर्गने 24 जानेवारी रोजी ‘अदानी ग्रुप: हाऊ द वर्ल्डस थर्ड रीचेस्ट मॅन इज पुलिंग द लार्जेस्ट कॉन इन कॉर्पोरेट हिस्ट्री’ नावाने हा हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. याच रिपोर्टला अदानी ग्रुपने निवेदन जारी करत उत्तर दिलं आहे. अदानी ग्रुपने आपल्या निवेदनातून म्हटले की, 24 जानेवारीला मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन हिंडनबर्गता रिसर्च रिपोर्ट वाचून आम्हाला धक्का बसला आहे, आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हा रिपोर्ट खोटा आहे. हिंडनबर्गचे दस्तऐवज निवडक माहितीचे एका वाईन हेतूने केलेले संयोजन आहे, एका विशिष्ट उद्देशाने अदानी ग्रुपला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आले आहेत.

- Advertisement -

गुंतवणूकदारांचे नुकसान करत शॉर्ट सेलिंगच्या माध्यमाने मोठा नफा कमावण्यासाठी हिंडनबर्ग सिक्युरिटीजने एक खोटा बाजार तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा अत्यंत चिंतेचा विषय आहे की, कुठलीही विश्वसनियता नसलेल्या अथवा तत्वनिष्ठेचा अभाव असलेल्या हजारो मैल दूरवरील एका संस्थेच्या विधानामुळे आमच्या गुंतवणूकदारांवर गंभीर परिणाम झाला आहे. अदानी एंटरप्रायजेस इक्विटी शेअर्सचा देशातील सर्वात मोठा एफपीओ घेऊन येण्याच्या तयारीत असताना हा रिपोर्ट आला, त्यामुळे रिपोर्टमागचा वाईट हेतू त्याच्या प्रसिद्धी वेळेवरूनही स्पष्ट होतोय.

अदानी ग्रुपने पुढे म्हटले की, हा केवळ एखाद्या कंपनीवर करण्यात आलेला अवास्तव हल्ला नाही, तर भारत आणि भारतातील संस्थांच्या स्वातंत्र्य, अखंडता, गुणवत्ता आणि भारताच्या विकासाच्या गाथा, आणि महत्वाकांक्षेवर केलेला नियोजित हल्ला आहे.

- Advertisement -

यात अदानी ग्रुपने हिंडनबर्ग रिपोर्टमधील तीन मुख्य संकल्पनाही सांगितल्या आहेत. यातील पहिली म्हणजे खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी आधीपासूनचं पब्लिक डोमेनमधील प्रकरणांचे सिलेक्टिव्ह आणि मॅनिपुलेटिव्ह प्रेझेंटेशन करण्यात आलं आहे. दुसरं म्हणजे, लिगल आणि अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि इंडस्ट्री प्रॅक्टिसचे पूर्ण अज्ञान किंवा जाणूनबूजुन अवहेलना करण्यात आली आहे. तर तिसर म्हणजे नियामक आणि न्यायव्यवस्थेसह भारतीय संस्थांचा पूर्णपणे अवमान यातून करण्यात आला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार; 2 वंदे भारत एक्स्प्रेसना दाखवणार हिरवा झेंडा?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -