Adani Group : अदानी समुहाच्या भांडवलात मोठी वाढ, भारतातील तिसरा उद्योग समूह

अदानी समुहाच्या भांडवलात मोठी वाढ झाली आहे. अदानी समूहात २०० अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यामुळे मार्केट कॅपिटलायझेशन होणारा अदानी समूह भारतातील तिसरा उद्योग समूह बनला आहे. या ग्रुपच्या सात लिस्टेड कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे शेअर्स ऑल टाईम हाय असल्याने अदानी समुहाने ही किमया केल्याचं स्पष्ट आहे.

अदानी समुहातील अदानी पॉवरमध्ये १५७ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये ५० टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ६७ टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये ५१ टक्के, अदानी पोर्ट्स अँड सेजमध्ये १७ टक्के आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये २८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

अदानी समुहाच्या सात लिस्टेड कंपन्यांचे भागभांडवल हे एकूण २०१ अब्ज डॉलर्स इतकं झालं आहे. भारतात सर्वाधिक भागभांडवल हे टाटा ग्रुपचं असून ते ३२० अब्ज डॉलर्स इतकं आहे. अदानी समुहाच्या पाच कंपन्यांचे भांडवल हे १ लाख कोटी रुपयांहून जास्त आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.

बुधवारी फोर्ब्सने २०२२ वर्षातील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जारी केली. रिलायन्स उद्योगसमूहाचे उद्योगपती मुकेश अंबानी ६.८७ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी दहाव्या क्रमांकावर आहेत. तर गौतम अदानी ११ व्या क्रमांकावर आहेत. अदानी समूहातील तीन कंपन्यांच्या शेअर्सने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

दरम्यान, मार्च महिन्यापासून शेअर्सच्या दरांमध्ये एकूण सात टक्क्यांची वाढ झाली होती. अदानी टोटल गॅस कंपनीकडून पीएनजी आणि सीएनजी गॅसचा पुरवठा करण्यात आला होता.


हेही वाचा : BEST Mobile Bill Center : मुंबईकरांसाठी बेस्ट सुविधा! रिचार्ज, बिल भरणे झाले सोपे