घरअर्थजगतमोठी बातमी! अदानी ग्रुपला दूरसंचार सेवेसाठी मिळाला परवाना; 'या' राज्यांतील ग्राहकांना मिळणार...

मोठी बातमी! अदानी ग्रुपला दूरसंचार सेवेसाठी मिळाला परवाना; ‘या’ राज्यांतील ग्राहकांना मिळणार लाभ

Subscribe

कंपनीकडून रिटेल टेलिकॉम सेवा पुरवण्यात येणार नाही. अदानी समूहाने आधीच 5G चे हक्क मिळवले आहेत. टेलिकॉम क्षेत्रात येऊन ते खासगी 5G नेटवर्क सुविधा उभी करणार आहेत.

नवी दिल्ली – आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी आता टेलिकॉम क्षेत्रात उतरणार आहेत. अदानी डेटा नेटवर्क लिमिडेटला (Adani Data Network Limited) दूरसंचार सेवांसाठी सोमवारी परवाना देण्यात आला आहे. म्हणजेच, ही कंपनी आता भारतात टेलिकॉम सेवा पुरवू शकणार आहे. अदानी ग्रुपने 5G चे हक्क मिळवल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला आहे.

हेही वाचा – सहा महिन्यांत 8.98 लाख कोटींचे प्रत्यक्ष करसंकलन, 23.8 टक्क्यांची वाढ

- Advertisement -

अदानी समूहाकडून सुपर एअरवेवचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे वीजवितरणासह विमानतळांवर सुपर एअरवेवचा वापर करता येणार आहे. अदानी डेटा नेटवर्कला युएल देण्यात आले आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, मुंबई (महाराष्ट्र) या सहा ठिकाणीच टेलिकॉम सेवा पुरवण्यासाठी परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे सुरुवातीला अदानीकडून याच सहा ठिकाणी फाईव्ह जी सेवा मिळणार आहे.

दरम्यान, या कंपनीकडून रिटेल टेलिकॉम सेवा पुरवण्यात येणार नाही. अदानी समूहाने आधीच 5G चे हक्क मिळवले आहेत. टेलिकॉम क्षेत्रात येऊन ते खासगी 5G नेटवर्क सुविधा उभी करणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – दिवाळीला सोने लकाकणार, चांदीही महागणार; जाणून घ्या बाजारभाव

मुकेश अंबानींसोबत स्पर्धा

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे भारतातील दोन्ही उद्योगपती जगप्रसिद्ध आहेत. गुजरातमधील हे उद्योजक एकमेकांशी थेट स्पर्धा करत नव्हते. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने तेल, रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्ससह टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रात व्यापार विस्तारला आहे. तर, अदानी समूहाने पोर्ट, कोळशाचा खाणी, ग्रीन एनर्जी, वीजवितरणसह एविएशन क्षेत्रात व्यापार विस्तार केला आहे. असं असतानाच, अदानी समूहाने नुकतंच पेट्रोकेमिकल क्षेत्रात प्रवेश केला असून रिलायन्स समूहानेही ग्रीन एनर्जी क्षेत्रात एन्ट्री केली आहे. तसंच, टेलिकॉम क्षेत्रात अदानी समूहाचा प्रवेश झाल्याने आता या दोन्ही उद्योगपतींमध्ये थेट स्पर्धा होणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -