Adani Airport: अदानीला अच्छे दिन! मुंबईनंतर जयपूर विमानतळावर राज

अदानींकडे आलेले जयपूर विमानतळ हे सातवे विमानतळ

Adani Group took Responsibility of Jaipur International Airport
Adani Airport: अदानीला अच्छे दिन! मुंबईनंतर जयपूर विमानतळावर रा

अदानी समूह (Adani Group) एविएशन सेक्टरमध्ये आपली मजबूत पकड तयार करताना दिसत आहेत. मुंबईनंतर आता जयपूर विमानतळाची जबाबदारी देखील अदानी समूहाकडे  देण्यात आली आहे. (Adani Group took Responsibility of Jaipur International Airport ) भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सोमवारी अदानींनी जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची जबाबदारी घेतली. भारत सरकारने जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची जबाबदारी ५० वर्षांसाठी अदानी समूहाकडे दिली आहे. विमानतळाचे डायरेक्टर जेएस बलहारा यांनी सोमवारी अदानी जयपूर इंटरनॅशनल लिमिटेडचे चीफ एयपोर्ट ऑफिसर विष्णू झा यांच्याकडे विमानतळाची प्रतिकात्मक चावी सुपूर्त केली. एका वृत्तसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर विमानतळाचे ऑपरेशन, मॅनजमेंट,डेव्हलपमेंट अदानी समूह पीपीपी मॉडेलवर केले जाणार असल्याचे विष्णू झा यांनी म्हटले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असलेल्या अदानींकडे आलेले जयपूर विमानतळ हे सातवे विमानतळ आहे. याआधी अदानींकडे सहा विमानतळांची जबाबदारी आहे. अदानी समुहाने जुलै महिन्यातच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात घेतले होते.

देशातील सर्व विमानतळाची शान आणखी वाढवण हे आमचे ध्येय आहे आणि आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू असे आश्वासन अदानी समूहाकडून देण्यात आले आहे. पुढील ५० वर्षे विमानतळ अदानी समूहाकडे असल्याने या काळात विमानतळांचा विकास, त्यांचे प्रशासकीय कामकाज आणि विमानतळाची देखभाल अदानी समूहाकडून करण्यात येणार आहे. पुढील काळात देशातील सर्वाधिक विमानतळांचा कारभार हाती घेण्याचे अदानी समूहाचे उद्दिष्ट्ये आहे.

देशातील प्रमुख विमानतळांचे मॅनेजमेंट खासगी लोकांच्या हातात देण्यासाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये निविदा काढली होती. तेव्हा अदानी समूहाने अहमदाबाद, लखनऊ, जयपूर, मँगलोर,गुहावटी आणि तिरुवनंतपुरम येथील विमानतळे आपल्या ताब्यात घेतली होती. अदानी समूहाने १०० टक्के भागीदारी करत ५० वर्षांसाठी या विमानतळांवर अदानी समूहाची मालकी असलणार आहे. अदानी समूहाची सब्सिडियरी AAHL म्हणजेच एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी एअरपोर्ट कंपनी म्हणून ओळखली जात आहे.


हेही वाचा – NCB छोटे मासे पकडण्यात व्यस्त, अदानींच्या बंदरावर सापडलेल्या ३००० किलो ड्रग्जबाबत गप्प का?, काँग्रेसचा सवाल