घरअर्थजगतअदानी समूहाच्या 'या' शेअर्सने गाठली आतापर्यंतची नीचांकी पातळी

अदानी समूहाच्या ‘या’ शेअर्सने गाठली आतापर्यंतची नीचांकी पातळी

Subscribe

Adani Enterprises | गेल्या तीन दिवसांपासून अदानी समूहाचे शेअर्स गडगडले आहेत.

Adani Enterprises | मुंबई – हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यांनी आपला नियोजित एफपीओही मागे घेतला आहे. त्यातच, गेल्या तीन दिवसांपासून अदानी समूहाचे शेअर्स गडगडले आहेत.

गेल्या सात दिवसांत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. तर, याचा परिणाम अदानी एन्टरप्रायजेसला झाला आहे. अदानी एन्टरप्रायजेस ही अदानी समूहाची फ्लॅगशीप कंपनी आहे. शुक्रवारच्या सत्रात या कंपनीचे शेअर्स ३० टक्क्यांनी घसरल्याने शेअर्सची किंमत १०९५.३० रुपये झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वांत निचांकी पातळी असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हिंडनबर्ग अहवालावरून विरोधकांचा गदारोळ, संसदेचे कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित

हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. आतापर्यंत ८३ टक्क्यांची घट झाली असून कंपनीच्या शेअर्स इंट्रा डेमध्ये १ फेब्रुवारी रोजी ३५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. २ फेब्रुवारीला शेअर्स २७ टक्के, तर ३ फेब्रुवारीला ३० टक्के घसरण झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या परिस्थितीचा अदानी रिअॅल्टीच्या सध्याच्या प्रकल्पांवर आणि धोरणात्मक वाढीवर कोणताही परिणाम होणार नाही आणि आम्ही सुरू असलेले प्रकल्प यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहोत. अदानी रियल्टीचे मजबूत व्यवसाय मूलतत्त्वे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन आर्थिक वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी आणि त्याच्या भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्रित आहे, अशी प्रतिक्रिया अदानी रिअल्टीच्या प्रवक्त्यांनी दिली.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) अहवालामुळे अदानी ग्रुप मोठा फटका बसला आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहातील सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण सुरू असतानाच सुमारे २० हजार रुपये मूल्याचा एफपीओ मागे घेण्याची वेळ अदानी समूहावर ओढवली आहे. अशातच आता अदानी समुहाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च अहवालानंतर आर्थिक तोटा सहन करणाऱ्या अदानी समुहाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. एका याचिकाकर्त्याने गुंतवणूकदारांच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – ‘हिंडनबर्गचा रिपोर्ट खोटा, कोणतंही रिसर्च केलं नाही”; अदानी ग्रुपचा दावा

अदानीकडून हिंडनबर्गला प्रतित्युतर

हिंडनबर्गने 24 जानेवारी रोजी ‘अदानी ग्रुप: हाऊ द वर्ल्डस थर्ड रीचेस्ट मॅन इज पुलिंग द लार्जेस्ट कॉन इन कॉर्पोरेट हिस्ट्री’ नावाने हा हा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. याच रिपोर्टला अदानी ग्रुपने निवेदन जारी करत उत्तर दिलं होतं. अदानी ग्रुपने आपल्या निवेदनातून म्हटले की, 24 जानेवारीला मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन हिंडनबर्गता रिसर्च रिपोर्ट वाचून आम्हाला धक्का बसला आहे, आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हा रिपोर्ट खोटा आहे. हिंडनबर्गचे दस्तऐवज निवडक माहितीचे एका वाईट हेतूने केलेले संयोजन आहे, एका विशिष्ट उद्देशाने अदानी ग्रुपला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -