घरताज्या घडामोडीहिंडेनबर्ग अहवालावर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी; अदानींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

हिंडेनबर्ग अहवालावर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी; अदानींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

Subscribe

हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपामुळे अदानी समुह मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच, अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली असून, उद्योगपती गौतम अदानी श्रीमंतीच्या यादीतून बाहेर पडले आहेत.

हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपामुळे अदानी समुह मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच, अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली असून, उद्योगपती गौतम अदानी श्रीमंतीच्या यादीतून बाहेर पडले आहेत. असे असतानाच आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयात या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी करणार आहे. (adani hindenburg report supreme court hearing on friday regarding investigation of hindenburg report conspiracy)

ही याचिका वकील एमएल शर्मा आणि विशाल तिवारी यांनी दाखल केल्या आहेत. याचिकाकर्ते अधिवक्ता विशाल तिवारी यांनी आज तातडीच्या यादीसाठी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्यासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. CJI यांनी विनंती मान्य केली आणि PIL ला दुसर्‍यासह टॅग करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे या याचिकेवर उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकाकर्त्यांनी लवकर सुनावणीची मागणी केली आहे. अधिवक्ता विशाल तिवारी यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाकडे लवकर सुनावणीची मागणी केली आहे. दरम्यान, या याचिकेत 500 कोटींवरील उच्च उर्जा कर्जासाठी मंजुरी धोरणासाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. हिंडेनबर्ग अहवालात अदानी समूहावर लावण्यात आलेल्या आरोपांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात आहे.

विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या सूचनाही सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आल्या आहेत. याशिवाय एसआयटीमध्ये सेबी, सीबीआय आणि ईडीसह अन्य तपास यंत्रणांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तुर्कस्तान भूकंपातील मृतांचा आकडा 15 हजारांच्या पार; अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -