पाक, अफगाणिस्तान आणि इराणमधील येणारा माल मुंद्रा बंदरात उतरणार नाही, अदानी समूहाचा निर्णय

Adani Ports won’t handle cargo from Iran, Pakistan, Afghanistan after Mundra drug haul
पाक, अफगाणिस्तान आणि इराणमधील येणारा माल मुंद्रा बंदरात उतरणार नाही, अदानी समूहाचा निर्णय

गुजरातच्या मुंद्रा बंदरावर काही दिवसांपूर्वी हेरोईन मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता अदानी समूहाने मोठा निर्णय घेतला आहे. आज, सोमवारी अदानी समूहाने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आता पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणमधून आयात आणि निर्यात होणारा माल अदानी समूह हाताळणार आहे. कंपनीचा हा निर्णय १५ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.

अदानी समूहाने म्हटले आहे की, आपल्या सर्व टर्मिनलवर १५ नोव्हेंबरपासून इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणारे कंटेनर हाताळणे बंद करणार आहे. माहितीनुसार, गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा बंदरावर हेरोईन मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली होती. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) पकडण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत जवळपास २१ हजार कोटी रुपये आहे. बंदरावरील दोन कंटेनर्समध्ये जवळपास ३ हजार किलो हेरोईन जप्त केली होती. यासोबत दोन जणांना अटक करण्यात आली होती.

सरकारी एजेंसीने सांगितले की, दोन कंटेनरमध्ये हेरोईन ठेवले होते. तेव्हा डीआरआयने सांगितले की, एका कंटेनरमध्ये जवळपास २ हजार किलोग्रॅम (४,४०९ पाउंड) हेरोईन आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये १ हजार किलोग्रॅम खेप अफगाणिस्तानमधून आली होती. हे सर्व इराण बंदरावरून गुजरातला पाठवले होते.


हेही वाचा – क्रूझ ड्रग्ज प्रकरण, खरं लक्ष्य ‘शाहरुख खान’- शॉटगन शत्रुघ्न सिन्हांची तोफ धडाडली