घरअर्थजगतAdani Power : मुंद्रा प्रकल्पात हरित अमोनियाचा वापर; शाश्वत भविष्यासाठी पर्यावरणपूरक ऊर्जा...

Adani Power : मुंद्रा प्रकल्पात हरित अमोनियाचा वापर; शाश्वत भविष्यासाठी पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती

Subscribe

अहमदाबाद – अदाणी पॉवर (APL) या भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या ऊर्जा निर्मिती कंपनीने हरित अमोनिया ज्वलन प्रकल्प हाती घेतला आहे. एपीएलच्या मुंद्रा येथील ऊर्जा निर्मिती प्रकल्पात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. 2030 पूर्वी ऊर्जा संक्रमण आणि उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने जागतिक संस्था काम करत आहेत. 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाच्या वातावरण बदल परिषदेला (COP 28) संयुक्त अरब अमिरातीत सुरुवात होणार आहे. या परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख एकत्र येणार आहेत, त्याच वेळी अदाणी पॉवरने हे हरित पाऊल टाकले आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून, भारतातील सर्वात मोठा खाजगी क्षेत्रातील ऊर्जा प्रकल्प असलेल्या कंपनीच्या मुंद्रा प्रकल्पातील पारंपारिक कोळशावर आधारित 330 मेगावॅट युनिटच्या बॉयलरमध्ये 20%पर्यंत हरित अमोनियाद्वारेही ऊर्जा निर्मिती होईल.

- Advertisement -

हरित हायड्रोजनपासून तयार होणारा हरित अमोनियाची निर्मिती ही इलेक्ट्रोलिसिसद्वारे अक्षय ऊर्जा वापरून केली जाते. ती प्रकल्पातील बॉयलरसाठी पूरक आधार म्हणून कार्य करेल. अशा प्रकारच्या अमोनियामध्ये कार्बनचा अंश नसल्यामुळे ज्वलनातून कार्बनडाय आक्साईडचे उत्सर्जन होत नाही. परिणामी असा स्रोत हा जीवाश्म इंधनासाठी दीर्घकालीन जवळपास कार्बन नसण्याचा पर्याय उपलब्ध करून देतो. अदाणी पॉवरने यापूर्वीच ‘प्रति-युनिट’ उत्सर्जन क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अत्याधुनिक ‘अल्ट्रा सुपरक्रिटिकल टेक्नालाजी’चा उपयोग करुन कंपनीने आपल्या नवीन प्रकल्पामध्ये केला आहे.

ठळक वैशिष्ट्ये
• मुंद्रा येथील 330 मेगावॅट प्रकल्पासाठी हरित अमोनियाद्वारेही ऊर्जा निर्मिती
• हरित अमोनिया ज्वलनामुळे कार्बन उत्सर्जन नाही; परिणामी अधिक पर्यावरणानुकूल ऊर्जा निर्मिती
• एनईडीओ प्रकल्पांतर्गत जपानच्या आयएचआय कॉर्पोरेशन आणि कोवासह अदाणी पॉवर प्रायोगिक तत्त्वावर कार्यरत
• जपान-भारत स्वच्छ ऊर्जा भागीदारी अंतर्गत संबंधित प्रायोगिक प्रकल्प कार्यान्वित

- Advertisement -

अदाणी पॉवरने प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरु केला आहे. तसेच केंद्राच्या विस्ताराचे परीक्षण करण्यासाठी आयएचआय (IHI) आणि कोवा (Kowa-Japan) या जागतिक कंपन्यांसह भागीदारी केली आहे. कोवा ही कंपनी ऊर्जा बचत आणि ऊर्जा निर्मिती उत्पादनांमध्ये सक्रिय आहे. तर आयएचआय ही आघाडीची अवजड उद्योग कंपनी असून तिच्याकडे अमोनिया प्रज्वलन तंत्रज्ञान आहे. जपानमधील आयएचआयच्या सुविधेतील ज्वलन चाचण्या या 20% अमोनिया मिश्रणाद्वारे केलेल्या आहेत. मुंद्रा ऊर्जा केंद्रातील उपकरणांचे परिक्षण करून ते केले गेले आहे. दोन्ही साठवणूक इंधनामध्ये आर्थिक समानता प्राप्त झाल्यानंतर मुंद्रा ऊर्जा केंद्रावर ही सुविधा अंमलात आणण्यासाठीचे परिणाम हे पुरेसे उत्साहवर्धक असतील, असा भागीदारांना विश्वास आहे. अशा या अत्याधुनिक हरित उपक्रमासाठी कंपनीचा मुंद्रा प्रकल्प हा जपानबाहेरचा पहिला प्रकल्प ठरला आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची संकल्पना जपान-भारत स्वच्छ ऊर्जा भागीदारी (CEP) अंतर्गत करण्यात आली आहे. तिचे उद्दिष्ट ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे, किमान कार्बन प्राप्त करणे आणि आर्थिक वाढ साध्य करणे आहे. न्यू एनर्जी अँड इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (NEDO)च्या “कमी कार्बन उत्सर्जन आणि ऊर्जा संक्रमणात योगदान देणाऱ्या जपानी तंत्रज्ञानासाठी आंतरराष्ट्रीय प्रात्यक्षिक प्रकल्प” अंतर्गत या उपक्रमाची निवड करण्यात आली आहे. NEDO ही जपानची राष्ट्रीय संशोधन आणि विकास संस्था असून ती शाश्वत समाजप्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक विकासाला चालना देऊन नवकल्पना वृद्धिंगत करते.

या उपक्रमाबाबत अदाणी पॉवर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना म्हणाले की, “अदाणी पॉवर ही कंपनीच्या व्यवसाय मूल्य शृंखलेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून आणि सक्रिय उपाययोजनांद्वारे कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे. हे धोरण पुढे नेण्यासाठी आम्ही आमच्या मुंद्रा येथील प्रकल्पाकरिता हरित अमोनियाचे मिश्रण करण्यासाठी आयएचआय आणि कोवासह भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे, यामुळे कार्बन डायआक्साईडचे (CO2) उत्सर्जन कमी होईल. दरम्यान उत्सर्जन कमी करण्यासाठी आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सामायिक धोरण यापुढेही कायम ठेवू.”

हेही वाचा : MLA Disqualification : एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावरील प्रश्नावर सुनील प्रभू अडखळले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -