घरअर्थजगतअदानींचे शेअर्स 70 टक्क्यांपर्यंत गडगडले, हिंडेनबर्ग रिपोर्टचा नकारात्मक परिणाम

अदानींचे शेअर्स 70 टक्क्यांपर्यंत गडगडले, हिंडेनबर्ग रिपोर्टचा नकारात्मक परिणाम

Subscribe

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापार सत्रातही अदानी समूहाचे अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन आणि अदानी टोटलचे शेअर्स घसरणीसह बंद झाले होते. विशेष म्हणजे ही घसरण आजही पाहायला मिळत आहे

नवी दिल्लीः हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर अदानींच्या शेअर्सला घरघर लागली आहे. ती अद्यापही काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अदानींच्या कंपन्यांसंदर्भातला हिंडेनबर्ग रिपोर्ट 24 जानेवारी 2023 रोजी समोर आला, त्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 70 टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. सर्वाधिक घसरण ही अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये पाहायला मिळतेय. अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स सोमवारी मोठ्या घसरणीसह व्यवसाय करीत आहेत. तसेच अदानी समूहाचे शेअर्सही 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर आहेत. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापार सत्रातही अदानी समूहाचे अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन आणि अदानी टोटलचे शेअर्स घसरणीसह बंद झाले होते. विशेष म्हणजे ही घसरण आजही पाहायला मिळत आहे.

70 टक्क्यांपर्यंत अदानी टोटल गॅसचे शेअर्स घसरले

- Advertisement -

हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर सर्वाधिक घसरण ही अदानी टोटल गॅस(Adani Total Gas)च्या शेअर्समध्ये झाली. कंपनीचे शेअर्स 24 जानेवारी 2023 नंतर जवळपास 70 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. अदानी टोटल गॅस (Adani Total Gas)चे शेअर्स 24 जानेवारी 2023ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 3885.45 रुपयांच्या पातळीवर घसरले. कंपनीचे शेअर्स 13 फेब्रुवारी 2023ला म्हणजेच आज 1195.35 रुपयांच्या स्तरावर पोहोचलेत. कंपनीच्या समभागातील ही 52 आठवड्यांतील सर्वाधिक घसरण आहे.

अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये 64 टक्क्यांची घसरण

- Advertisement -

अदानी ग्रीन एनर्जी यांच्या शेअर्समध्ये हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर 64 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. कंपनीचा शेअर्स 1913.55 रुपयांनी घसरून 687.75 रुपयांवर आला आहे. तर अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 2756.15 रुपयांनी घसरून 13 फेब्रुवारी 2023ला 1126.85 रुपयांवर आला आहे.

43 टक्क्यांपर्यंत अदानी पॉवरचे शेअर्स घसरले

अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जीसारखेच अदानी पॉवरच्या शेअर्समध्येही गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. अदानी पॉवरचे शेअर्स 24 जानेवारीला 274.80 रुपयांच्या स्तरावर होते. कंपनीचे शेअर्स 13 फेब्रुवारी 2023ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 156.10 रुपयांपर्यंत घसरले आहेत.

अदानी एंटरप्राइजेसचे शेअर्स 48 टक्क्यांनी घसरले

अदानी एंटरप्राइजेसचे शेअर्स आतापर्यंत 48 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. अदानी एंटरप्राइजेसचे शेअर्स 24 जानेवारी 2023ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 3442.75 रुपयांच्या स्तरावर होते. तर कंपनीचे शेअर्स 13 फेब्रुवारी 2023ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1768.35 रुपयांच्या स्तरावर आहे.


हेही वाचाः पैसे असताना ठाकरेंनी मुंबईकरांना विकासापासून वंचित ठेवलं- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -