गर्भाशयाच्या कॅन्सरमधून वाचणार आता महिलांचा जीव, सीरमची पहिली ‘HPV’ लस लाँच

Adar Poonawalla-led Serum Institute of india launches first Made in India HPV cervical cancer vaccine

भारतात कोरोना महामारी रोखण्यात सीरमच्या लसीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोरोनावर सीरमने कोव्हिशील्ड ही लस बाजारात आणली ज्यातून करोडो नागरिकांचा जीव वाचला. अशात सीरमने आता गर्भाशयाच्या कॅन्सरवर पहिली मेड इन इंडिया लस बाजारात आणली आहे. या पहिल्या HPV लसीबाबत सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. या लसीमुळे महिलांचा सर्विकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाच्या कॅन्सरमधून जीव वाचवण्यास मदत होणार आहे.

आज देशभरात राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तसेच या महिन्यात गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जनजागृती केली जात आहे. याच दिवसाचे महत्त्व लक्षात घेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियावने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पहिल्या मेड इन इंडिया HPV लस लाँच केली आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी ट्विट करत दिली आहे.

भारतात 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर सर्वाधिक आढळून येणारा दुसरा कॅन्सरचा प्रकार आहे. मात्र यावर अद्याप कोणतही प्रभावी औषध असल्याने अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागतोय. मात्र आता या लसीमुळे महिलांच आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

काही दिवसांपूर्वी अदर पूनावाल यांनी लसीच्या किमतीबाबत भाष्य केलं आहे. त्यावर बोलताना पूनावाला म्हणाले होते की, आपल्या देशात पहिल्यांदा ही दिली जाईल, त्यानंतर ती जगभरातील देशांना पाठवली जाईल, या लसींची किंमत 200 रुपये ते 400 रुपयांच्या दरम्यान असेल, पण अद्याप किंमतींबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 2 वर्षात 200 मिलियन डोस तयार करण्याचा कंपनीचा मानस असल्याचं पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.

गर्भाशयाच्या कॅन्सरविरोधात भारतात पहिल्या कॉड्रिव्हेलंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस वॅक्सिनला नुकतचं भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मार्केट ऑथरायजेशनसाठी मंजूरी दिली आहे. भारतातील या पहिल्या HPV लसीमागचा उद्देश महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून वाचवणे हा आहे.

भारतात गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे सर्वाधिक मृत्यू होतात. दरदिवसा भारतात कॅन्सरमुळे 95 ते 100 महिलांचा मृत्यू होतो. जागतिक पातळीवर दरवर्षी 80 हजारांहून अधिक प्रकरणं ही गर्भाशयाच्या कॅन्सरसंदर्भात आहेत. जगाच्या तुलनेत 25 टक्के रुग्ण एकट्या भारतात आहेत. तर दरवर्षातील गर्भायश कॅन्सरमुळे 1 लाख महिलांमधील 22 रुग्णांचा मृत्यू होतो. भारतीय महिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आजारांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा आजार टाळता येऊ शकतो मात्र त्यावर योग्य वेळी योग्य उपचार झाले पाहिजेत.

सध्या जगभरात गर्भाशयाच्या कर्करोगासाठी दोन लसी उपलब्ध आहेत. यातील पहिली क्वाड्रिव्हॅलेंट लस तर दुसरी बायव्हॅलेंट लस आहे. हेपॅटायटीस बी लसीप्रमाणे (Virus-like particles) ही लस आहे. या लसीच्या लाँचिंगमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रोखण्यास मदत होत होईल तसेच मृतांचे प्रमाण रोखण्यासही मदत होईल असं डॉक्टरांच मत आहे.


गर्भाशय कॅन्सरवर पहिली स्वदेशी लस तयार; लाखो महिलांना मिळणार दिलासा