घर देश-विदेश पुढील वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना..., पंतप्रधान मोदी यांना विश्वास

पुढील वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना…, पंतप्रधान मोदी यांना विश्वास

Subscribe

नवी दिल्ली : देशभरात आज, मंगळवारी 77वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावून देशाला संबोधित केले. हे अमृतकाळाचे पहिले वर्ष असून पुढील पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची आहेत. पुढील स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना देशाच्या विकासाचे, संकल्पाचे गौरवगान करेन, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – PM Modi : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे मणिपूरच्या नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

- Advertisement -

देशाच्या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आज, मंगळवारी लालकिल्ल्यावर आपला राष्ट्रध्वज फडकवला. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममधील स्वातंत्र्यदिनाचे शेवटचे संबोधन केले. आतापर्यंत पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या संबोधनातून विविध घोषणा केल्या असून, यंदाच्या भाषणात त्यांनी गेल्या नऊ वर्षांच्या आपल्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडला. तसेच 2047पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

देशात 2014मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी परिवर्तन घडविण्याचे आश्वासन मी दिले होते. त्या पाच वर्षांत मी ते आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. रीफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मद्वारे मी परिवर्तन करत गेलो. त्यामुळे आश्वासनाचे रुपांतर विश्वासात झाले. मी कठोर परिश्रम केले. देश प्रथम याच भूमिकेतून हे परिश्रम केले. माझी हीच कामगिरी पाहून 2019मध्ये तुम्ही मला पुन्हा आशीर्वाद दिला. आता पुढील पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची आहेत. 2047पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही पाच वर्षे अतिशय महत्त्वाची आहेत. पुढील स्वातंत्र्यदिनाला देशाची प्रगती, तुमचे सामर्थ्य, तुमचे संकल्प आणि त्यांची यशस्वीता याचे गौरवगान याच लाल किल्ल्यावरून करणार असल्याचा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – आमचे सरकार येताच देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म…, मोदींनी मांडला 9 वर्षांचा लेखाजोखा

मी तुमच्यापैकीच एक आहे. मी तुमच्यासाठीच जगतो. मला स्वप्नही पडते ते तुमच्यासाठीच पडते. मी घाम गाळतो, तोही तुमच्यासाठीच. तुम्ही माझ्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली आहे, म्हणून हे करत नाही. तर, तुम्ही माझे कुटुंब आहात. तुमच्याच कुटुंबातील सदस्य असल्याने तुमचे दु:ख मी पाहू शकत नाही. तुमचे स्वप्नभंग होताना पाहू शकत नाही. तुमचे संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमचा एक सहकारी बनून तुमच्या बरोबर राहण्याचा, संघर्ष करण्याचा इरादा मी केला आहे, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी अमृतकाळचे महत्त्व विषद करताना एक कविताही ऐकविली –
चलता चलाता कालचक्र, अमृतकाल का भालचक्र
सबके सपने, अपने सपने, पनपे सपने सारे,
धीर चले, वीर चले, चले युवा हमारे,
नीती यही, रीती नई, गती सही, राह नई,
चुनो चुनौती सीना तान, जग में बढाव देश का नाम

- Advertisment -