घरदेश-विदेशकोरोना नियमांचे पालन हाच राष्ट्रधर्म

कोरोना नियमांचे पालन हाच राष्ट्रधर्म

Subscribe

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशवासियांना आवाहन

कोरोना महामारीचे संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे सर्वांनी कोरोनासंबंधिच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या नियमांचे पालन करणे म्हणजे राष्ट्रधर्म आहे, जोपर्यंत ही स्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत या राष्ट्रधर्माचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना उद्देशून केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून राष्ट्रपतींनी भाषण केले. या भाषणात त्यांनी प्रामुख्याने देशाच्या कोरोनाविरोधातील लढाईवर भाष्य केले.

राष्ट्रपती म्हणाले की, मानव समुदयाला याआधी कधीही पडली नव्हती तेवढी एकमेकांच्या सहकार्याची गरज सद्यस्थितीला पडत आहे. दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी कोरोना विषाणूशी लढा अद्याप सुरूच आहे. या महामारीच्या विळख्यात सापडून हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर आघात झाला. भारतात लोकसंख्येची घनता अधिक असल्याने आपल्यासाठी ही लढाई कठीण असल्याचे म्हटले जात होते. पण आपण आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली, स्वदेशी लसी देखील विकसित केल्या आणि दुसर्‍या देशांच्या मदतीसाठी देखील पुढे आलो. भारताच्या या योगदानाची जागतिक स्तरावरही कौतुक करण्यात आले आहे.

- Advertisement -

हा विषाणू रूप बदलून सातत्याने संकट निर्माण करत आहे. त्यामुळे आपण सतर्क राहण्याची गरज आहे. आपण आजवर सावधानता बाळगली आहे ती अशीच पुढे सुरू ठेवायची आहे. कोविड महामारीच्या लढाईत वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी सांगितलेल्या सावधानतेचे पालन करणे प्रत्येक देशवासियाचा राष्ट्रधर्म बनला आहे. जोवर हे संकट दूर होत नाही तोपर्यंत आपल्याला हा राष्ट्रधर्म पाळायचाच आहे, असे आवाहनही यावेळी राष्ट्रपतींनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -