नवी दिल्ली : चांद्रयान -3 मोहीमेच्या यशानंतर आता आदित्य एल1 मोहीमेसाठी इस्रो (ISRO) तयार असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (S. Somanath) यांनी दिली आहे. आदित्य एल1 सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच करण्यात येणार असल्याची माहिती ही सोमनाथ यांनी शनिवारी तिरुवनंतपुरुम आंतरराष्ट्रीय विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली. त्याचबरोबर चांद्रयान – 3 या मोहीमेचे बहुतेक वैज्ञानिक मिशनची उद्दिष्टे ही आता पूर्ण होताना दिसत आहेत आणि इस्रोची टीम पुढील 13-14 दिवसांसाठी टीम उत्साहित आहे, असेही सोमनाथ यांनी सांगितले.
एस. सोमनाथ म्हणाले, “आदित्य एल 1 उपग्रह हा तयार असून श्रीहरीकोटा येथे देखील पोहोचला आहे. पीएसएलवीला आदित्य एल1 जोडण्यात आला आहे. आता आदित्य एल1 प्रक्षेपण करणे हे इस्रोचे नवे लक्ष आहे. आदित्य एल1च्या तारखेची घोषणा ही येत्या दोन दिवसात करण्यात येणार आहे. आदित्य एल1 या उपग्रहचे प्रक्षेपण केल्यानंतर हा लंबवर्तुळाकार कक्षेत जाईल. येथून ते L1 बिंदूपर्यंत जाईल, ज्याला सुमारे 120 दिवस लागतील,” अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा – ISRO : पंतप्रधान मोदींनी घेतली इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट, चांद्रयान 3 लॅंड झालेल्या जागेला ‘शिवशक्ती’ नाव
लँडर आणि रोव्हर कार्यरत
चांद्रयान – 3 या मोहीमेचे बहुतेक वैज्ञानिक मिशनची उद्दिष्टे ही आता पूर्ण होताना दिसत आहेत. लँडर आणि रोव्हर हे कार्यरत असून वैज्ञानिक डेटा हा खूप चांगला दिसत आहे. या डेटाचा आम्ही अभ्यास करत आहोत. यामुळे पुढील 13 ते 14 दिवसांची वाट पाहत आहोत, अशी माहिती ही एस. सोमनाथ यांनी दिली आहे.
हेही वाचा – Chandrayaan-3: चांद्रयानाचं पहिलं नाव होतं…; ही अटलबिहारी वाजयपेयींची कल्पना; केंद्रीय मंत्र्यांचं विधान
अंतराळ क्षेत्राबात पंतप्रधानांकडे मोठी दूरदृष्टी
चांद्रयान- 3च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इस्रोच्या मुख्यालयात गेल्यानंतर सर्वांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. आणि चांद्रयान – 3 यशस्वी लँडिंगवर पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “पंतप्रधानांच्या दौऱ्यावर आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. पंतप्रधान मोदींकडे अंतराळ क्षेत्राबाबत मोठी दूरदृष्टी आहे”, असे सोमनाथ यांनी पंतप्रधानांच्या इस्रोच्या भेटीसंदर्भात प्रतिक्रिया दिली.