Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश आदित्य-L1 मिशन: सूर्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे; पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडलं आदित्य-L1

आदित्य-L1 मिशन: सूर्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे; पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडलं आदित्य-L1

Subscribe

ISRO Aditya-L1 मिशन: पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर ‘आदित्य-L1’ आता सूर्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे गेले आहे. सुमारे 110 दिवसांच्या प्रवासानंतर हे यान L1 बिंदूच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रात्री उशिरा आदित्य-L1 मिशनवर हे अपडेट दिलं आहे. ISRO ने कळवले की ट्रान्स-लॅग्रेन्जियन पॉइंट 1 इन्सर्शन (TL1I) पूर्ण झाले आहे. अंतराळयान आता एका मार्गावर आहे जे ते सूर्य-पृथ्वी L1 बिंदूवर घेऊन जाईल. पृथ्वीच्या कक्षेबाहेर अंतराळयान पाठवण्यात इस्रोचे हे सलग पाचवे यश आहे. सूर्य मोहिमेपूर्वी इस्रोने चांद्रयान-3 यशस्वीपणे प्रक्षेपित करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले होते. (Aditya L1 mission another step towards the Sun Aditya L1 fell out of Earth s orbit )

इस्रोच्या मते, आदित्य-L1 अंदाजे 110 दिवसांत L1 पॉइंटवर पोहोचेल. त्यानंतर, ते L1 च्या कक्षेत प्रवेश करेल.

इस्रोची मोठी कामगिरी

- Advertisement -

देशाची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या इस्रोने आतापर्यंत कित्येक मोठ्या अंतराळ मोहिमा यशस्वीरपणे पार पाडल्या आहेत. चांद्रयान, मंगळयान अशा मोहिमांचा यात समावेश आहे. आदित्य एल-1 ही भारताची पहिलीच सौरमोहिम आहे. आदित्यच्या माध्यमातून इस्रोने सलग पाचव्यांदा एखादा उपग्रह किंवा वस्तू यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवली आहे.

काय आहे मोहिम?

आदित्य एल-1 मोहिम ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी राबवण्यात येत आहे. यासाठी आदित्य नावाचा उपग्रह L1 या लॅंग्रेस पॉइंटवर प्रस्थापित करण्यात येईल. पृथ्वीवरून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ठराविक वेळेचं बंधन असतं, तसचं बरेच अडथळेही येतात. या पॉइंटवरून मात्र आदित्य 24*7 विना अडथळा सूर्याचं निरीक्षण करू शकणार आहेत.

- Advertisement -

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य उपग्रहावर असणाऱ्या सात पेलोइस पैकी STEPS उपकरणाने आपलं काम सुरूदेखील केलं आहे. या उपकरणातील सेन्सरने पृथ्वीभोवती असणारे सुप्रा-थर्मल आणि ऊर्जावान आयन आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरूवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवती असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत करतो.

(हेही वाचा: महाराष्ट्रानंतर आता कर्नाटकातही वाहतायेत सत्तांतराचे वारे! दावे-प्रतिदाव्यांना आला वेग )

- Advertisment -