घर देश-विदेश Aditya L1 Mission : भारताची पहिली सौर मोहीम सूर्याच्या आणखी जवळ; आदित्य...

Aditya L1 Mission : भारताची पहिली सौर मोहीम सूर्याच्या आणखी जवळ; आदित्य L1 ने तिसर्‍यांदा बदलली कक्षा

Subscribe

Aditya L1 Mission : भारतीची पहिली सौर मोहिम आदित्य एल1 (Aditya L1 Mission) सूर्याच्या आणखी जवळ पोहचली आहे. आदित्य एल 1 ने आज तिसर्‍यांदा आपली कक्षा यशस्वीरित्या बदलली आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. (Aditya L1 Mission Indias first solar mission closer to the Sun Aditya L1 changed orbit for the third time)

इस्रोने ट्वीट करताना सांगितले की, आदित्य एल1ने तिसऱ्यांदा पृथ्वीची कक्षा यशस्वीरित्या बदलली आहे. बेंगळुरूमधील इस्रोच्या टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कवरून आदित्य एल 1ची कक्षा बदलण्याची प्रक्रिया निर्देशित करण्यात आली होती. याशिवाय मॉरिशस, बेंगळुरू आणि पोर्ट ब्लेअर येथील इस्रो ग्राउंड स्टेशनवरून आदित्य एल 1 च्या कक्षेत बदल करताना उपग्रहाचा मागोवा घेण्यात आला आहे.

- Advertisement -

15 सप्टेंबर रोजी चौथ्यांदा बदलणार कक्षा

इस्रोच्या मते, आदित्य एल 1 ची नवीन कक्षा 296 किमी x 71767 किमी आहे. म्हणजेच, पृथ्वी ज्या कक्षेत आहे त्या कक्षेपासूनचे किमान अंतर 296 किमी आणि कमाल अंतर 71767 किमी आहे. त्यामुळे 15 सप्टेंबर रोजी आदित्य एल1 पहाटे 2 वाजता चौथ्या कक्षेत प्रवेश करेल.

- Advertisement -

हेही वाचा – बायडेन यांच्यासाठी 12 हजार कोटींचे संरक्षण कंत्राट? प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

आदित्य एल 1 ने पहिल्यांदा कक्षा कधी बदलली?

दरम्यान, आदित्य एल 1 ने 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते. यानंतर आदित्य एल 1 ने 3 सप्टेंबर रोजी पहिल्यांदा आपली कक्षा बदलली. यानंतर 5 सप्टेंबर रोजी या उपग्रहाने दुसऱ्यांदा आपली कक्षा बदलली. इस्रो आदित्यला गुरुत्वाकर्षण क्षेत्रातून टप्प्याटप्प्याने बाहेर काढत आहे. आदित्य एल 1 पृथ्वीपासून 15 लाख किमी दूर एल 1 पॉइंटवर जाऊन सूर्याचा अभ्यास करणार आहे आणि सूर्यासंबंधी रहस्यांचा उलगडा करणार आहे.

हेही वाचा – G-20 : दहशतवाद आंतरराष्ट्रीय शांततेसाठी धोकादायक; शिखर परिषदेतील सूर

आदित्य-L1 काय अभ्यास करणार? 

  1. सौर वादळे, सौर लहरी येण्याची कारणे आणि त्यांचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो.
  2. सूर्यामधून बाहेर पडणाऱ्या उष्णता आणि उष्ण वाऱ्यांचा आदित्य अभ्यास करणार आहे.
  3. सौर वाऱ्यांचे वितरण आणि तापमानाचा अभ्यास करेल.
  4. सौर वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करेल.
- Advertisment -