घरदेश-विदेशAditya L1 Mission : पेलोडने अगदी जवळून टिपले 'सूर्याचे' फोटो; असे सुंदर...

Aditya L1 Mission : पेलोडने अगदी जवळून टिपले ‘सूर्याचे’ फोटो; असे सुंदर दृश्य कधीच पाहिले नसेल…

Subscribe

नवी दिल्ली : भारताची पहिली सूर्य मोहीम आदित्य एल 1, जे सूर्याच्या रहस्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि उलगडण्यासाठी Lagrange Point-1 म्हणजेच एल 1 च्या प्रवासाला निघाले आहे, ते आपल्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. ‘आदित्य’ Lagrange Point मध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आदित्य एल 1 मध्ये बसवण्यात आलेल्या पेलोड सूट (SUIT) ने सूर्याचे अतिशय सुंदर फोटो टिपण्यात यश मिळवले आहे. इस्रोने आज (8 डिसेंबर) ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. (Aditya L1 Mission Payload Captures Sun Photos Up Close Never seen such a beautiful sight)

हेही वाचा- Mahua Moitra : ‘भाजपाच्या अंताची सुरुवात’; खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा संतप्त

- Advertisement -

इस्रोने ट्वीट करताना निवेदनात म्हटले की, पेलोडने कॅप्चर केलेल्या फोटोंमध्ये  200 ते 400 नॅनोमीटर (nm) पर्यंतच्या तरंगलांबीमध्ये सूर्याचे पहिले पूर्ण डिस्क प्रतिनिधित्व समाविष्ट आहे. फोटोंमध्ये सूर्याचे प्रकाशमंडल आणि क्रोमोस्फियरचे गुंतागुंतीचे तपशील दर्शवत आहेत. आदित्य एल1 वर बसवलेले पेलोड सूट विविध वैज्ञानिक फिल्टर वापरून या तरंगलांबीच्या श्रेणीतील सूर्याचे फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियरचे फोटो काढण्यात यशस्वी झाले आहे. दरम्यान, आदित्य एल1 मध्ये स्थापित केलेला सूट पेलोड 20 नोव्हेंबर रोजी सक्रिय झाले होते आणि शस्वी प्री-कमिशनिंग टप्प्यानंतर 6 डिसेंबर 2023 रोजी सूट पेलोडने पहिल्यांदा फोटो घेतले, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

- Advertisement -

पृथ्वीवरील सौर विद्युत चुंबकीय प्रभावांच्या धोक्यांबद्दल चेतावणी

भारताचा आदित्य एल 1 उपग्रह हा एक प्रकारचा अवकाश आधारित संरक्षण आहे. हा उपग्रह सौर ज्वाला आणि आगामी सौर वादळांचे निरीक्षण करणार आहे. आदित्य एल 1 सतत सूर्यावर लक्ष ठेवेल. आपल्याला पृथ्वीवरील सौर विद्युत चुंबकीय प्रभावांच्या धोक्यांबद्दल चेतावणी देऊ शकणार आहे. पूर्व चेतावणी उपग्रह आणि इतर उर्जा आणि दळणवळण नेटवर्क विस्कळीत होण्यापासून रोखू शकणार आहे. सौर वादळ संपेपर्यंत ते सुरक्षितपणे ऑपरेट केले जाऊ शकते.

हेही वाचा- Onion Export Ban : नेमके सल्लागार कोण आहेत? सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारला विचारणा

आदित्य एल 1 कधी लाँच झाला?

आदित्य एल 1 चे प्रक्षेपण 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. इस्रो मिशन अंतर्गत वेधशाळा पाठवत आहे. 15 लाख किमीचा प्रवास पूर्ण केल्यानंतर ‘आदित्य’ सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या एल 1 जवळच्या कक्षेत पोहोचेल आहे. पाच वर्षांच्या मोहिमेदरम्यान ते एल 1 बिंदूवरून सूर्याचा अभ्यास करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -