घर देश-विदेश आदित्य-L1 प्रक्षेपणासाठी सज्ज; इस्रोने ट्वीट करत फोटो केले शेअर

आदित्य-L1 प्रक्षेपणासाठी सज्ज; इस्रोने ट्वीट करत फोटो केले शेअर

Subscribe

बंगळुरु : इस्रोच्या चांद्रयान – 3च्या यशानंतर आता ‘आदित्य-L1’ ही मोहीम हाती घेतली आहे. आदित्य-L1 मोहीमे अंतर्गत सूर्याचा अभ्यास करण्यात येणार असून ही भारताची पहिली सौरमोहीत असणार आहे. आता आदित्य हा उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी आदित्य-L1 हे श्रीहरीकोटा येथील लाँच पॅडवर सज्ज झाले आहे. येत्या 2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 50 मिनिटाने आदित्य – L1चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

आदित्य – L1 यासंदर्भात इस्रोने ट्वीट करत माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये आदित्य – L1चे फोटो देखील इस्रोने ट्वीट केले आहे. इस्रोने ट्वीटमध्ये म्हटले, पीएसएलव्ही-सी 57 या रॉकेट हे आदित्यL1 अवकाशात घेऊन जाण्यासाठी सज्ज झाले असून श्रीहरीकोटा येथील दुसऱ्या लाँच पॅडवरून प्रक्षेपण करण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या 2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 50 मिनिटाने आदित्य – L1चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Chandrayaan-3 नंतर आता इस्रोची ‘आदित्य एल-1’ मोहीम, सूर्याचा करणार अभ्यास

आदित्य मोहिमेतून सूर्याचा अभ्यास करणार

- Advertisement -

आदित्य-L1चे प्रक्षेपण केल्यानंतर हा उपग्रह सुमारे चार महिने उंतराळात प्रवास करणार असून सूर्य आणि पृथ्वीमध्ये असणाऱ्या एका लँग्रेज पॉइंटवर आदित्य-L1 हा उपग्रह ठेवण्यात येणार आहे. आदित्य – L1 या मोहिमेतून इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. यातून सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, कॉस्मिक रेज, सौर वादळे आणि अन्य गोष्टींचा अभ्यास करणे हे इस्रोला शक्य होणार आहे.

- Advertisment -