घरदेश-विदेशCovid Vaccine: किशोरवयीन मुलांसह आजारी मुलांना लसीकरणात प्रथम प्राधान्य; जाणून घ्या कधी...

Covid Vaccine: किशोरवयीन मुलांसह आजारी मुलांना लसीकरणात प्रथम प्राधान्य; जाणून घ्या कधी मिळणार लस

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. येत्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना लहान मुलांचे कोरोना लसीकरण कधी सुरू होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणाची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की, येत्या सप्टेंबरमध्ये मुलांच्या लसीकरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. अशा परिस्थितीत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे डॉक्टर प्रौढांप्रमाणेच आजार आणि वयाच्या आधारावर लहान मुलांसाठी प्राधान्य यादी तयार करून मुलांना लसीकरणाचा सल्ला देत आहेत. यानुसार १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना तसेच लठ्ठपणा आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या मुलांच्या लसीकरणास प्राधान्य दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एम्सच्या डॉक्टरांचे मते, देशातील मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण हे साधारण १२ टक्के आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या खूपच कमी आहे. दुसर्‍या लाटेत डेल्टा विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणाच असूनही १० वर्षाखालील ३.३३ टक्के मुलांमध्ये हा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यासह किशोरवयीन मुलांमध्ये आणि ११ ते २० वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये या संसर्गाचा दर ८.३५ टक्के इतका वाढल्याचे समोर आले आहे. सेरो सर्व्हेक्षणात असे समोर आले की, कोरोना अॅंटीबॉडीज मुलांमध्ये तसेच प्रौढांमध्येही आढळून आले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान लहान मुलांनाही संसर्ग झाला, परंतु ते आजारी पडले नाहीत. म्हणून लहान मुलांना जास्त धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोव्हॅक्सिन चाचणीमध्ये देखील १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना प्रथम लसीकरण आणि नंतर ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात आले होते. यानंतर २ ते ६ वयोगटातील मुलांची लसीकरणासाठी वेळ आली आहे.

- Advertisement -

एम्सचे बालरोग विभाग, प्राध्यापक डॉ. एसके काबरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रौढांप्रमाणेच मुलांनादेखील प्राधान्य यादीच्या आधारे लस देण्यात येणार आहे. १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर लसीच्या चाचण्यांविषयीचा डेटा देखील लवकर येण्याची अपेक्षा आहे, ज्याद्वारे ही लस किती सुरक्षित आणि प्रभावी आहे हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वात प्राधान्याने १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -