घर देश-विदेश विरोधकांकडे सिक्रेट वरदान आहे, ते ज्यांचं वाईट इच्छितात त्यांचे भले होते; मोदींचा...

विरोधकांकडे सिक्रेट वरदान आहे, ते ज्यांचं वाईट इच्छितात त्यांचे भले होते; मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

Subscribe

विरोधकांकडे असलेल्या गुपित आशीर्वादाची मिश्कील टिप्पणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या गुपीत आशीर्वादाचे माझ्याकडे काही उदाहरणे आहेत असे म्हणून त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

नवी दिल्ली : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर विश्वास साधला. ते म्हणाले की, विरोधकांमधील पक्षातील लोकांना एक गुपीत आशीर्वाद मिळाला आहे, असे माझे ठाम मत आहे. हे लोक ज्याचे वाईट करू इच्छितात त्यांचे कल्याण होते. 2018 मध्येही अविश्वास प्रस्ताव आणला होता मात्र, 2019 मध्ये झाले काय आपण बहुमताने निवडूण आलो. आताही अविश्वास प्रस्ताव आणला तेव्हा 2024 मध्ये पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक बहुमताने सत्तेत येऊ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यावेळी व्यक्त केला.

विरोधकांकडे असलेल्या गुपित आशीर्वादाची मिश्कील टिप्पणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या गुपीत आशीर्वादाचे माझ्याकडे काही उदाहरणे आहेत असे म्हणून त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

हे तीन उदाहरणे देऊन साधला निशाणा

- Advertisement -

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधकांकडे असलेल्या गुपीत आशीर्वादाचे तीन उदाहरणे देतो. विरोधकांनी म्हटले होते की, बँकिंग क्षेत्र उद्ध्वस्त होईल, देश उद्ध्वस्त होईल, यासाठी परदेशातून मोठे विद्वान आणले. अफवा पसरवण्याचे काम जोमाने करण्यात आले. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निव्वळ नफा दुपटीने वाढला आहे. एनपीएवर मात करून आम्ही नव्या ताकदीने बाहेर पडलो. दुसरे उदाहरण म्हणजे त्यांनी आमच्या संरक्षण हेलिकॉप्टर उत्पादन कंपनी HAL बद्दल बर्‍याच वाईट गोष्टी बोलल्या. वाईट भाषेचा वापर करून जगात हानी पोहोचवली. HAL नष्ट झाली आहे, ती संपली आहे असे सांगत त्यावेळी एचएएल कारखान्याच्या दारात कामगारांची बैठक घेऊन व्हिडिओ शूट करण्यात आले होते. तुमची मुले उपाशी मरतील, असे तेथील कामगारांना भडकवले. मात्र आज HAL यशाची नवीन शिखरे गाठत आहे. आतापर्यंत एचएएलने सर्वाधिक महसूल मिळवला. त्यांनी गंभीरपणे प्रयत्न करूनही हे घडले आहे. एलआयसी बुडत आहे, गरिबांचा पैसा जाणार कुठे. असे बोलत असत. आज LIC सतत मजबूत होत आहे. ज्या प्रकारे ते देशाला आणि लोकशाहीला शिव्याशाप देत आहेत, त्याच पद्धतीने देश-लोकशाही मजबूत होणार आहे.

हेही वाचा : “5 वर्षं दिली तरीही विरोधकांची तयारी नाही”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला

विरोधक जनतेचा विश्वास पाहू शकत नाहीत

- Advertisement -

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधक जनतेचा विश्वास पाहू शकत नाहीत. विरोधकांकडे हा शहामृगी दृष्टीकोण आहे. तर जुने लोक सांगतात की, जेव्हा एखादी शुभ घटना घडते तेव्हा मुलेही छान कपडे घालतात आणि काळा टिका लावतात. आज देशाच्या समृद्धीचा, देशाचा जल्लोष चौफेर सुरू आहे, म्हणून मी तुमचे आभार मानतो की, काळे कपडे घालून तुम्ही ते वाचवण्याचे काम केले आहे. एकुणच विरोधकांनी मोदी सरकारच्या निषेधार्थ काळे कपडे घालून निषेध केला होता त्याचा समाचार घेतला.

हेही वाचा : PM Narendra Modi : शतकात अनेक संधी, या काळाचा प्रभाव हजारो वर्षांपर्यंत राहील – मोदी

मला शिव्या घालून आता मोकळे वाटत असेल

संसदेत काल राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात वापरलेल्या शब्दांचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधकांच्या सहकाऱ्यांनी डिक्शनरी उघडून अपशब्द आणले. त्यानी खूप काही आणले, कुठून आणले माहीत नाही, पण मला शिव्या देऊन त्यांना आता मोकळे वाटले असेल. तसे ते रात्रंदिवस मला शिव्या देत राहतात. त्यांचा आवडता नारा आहे तो म्हणजे मोदी तेरी कबर खुदेगी. ही त्यांची आवडती घोषणा आहे, पण मी त्यांच्या शिव्यांची टॉनिक बनवतो. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला.

- Advertisment -