घरताज्या घडामोडीअफगाणिस्तान आणि तालिबान संघर्ष , काय आहे नेमके प्रकरण?

अफगाणिस्तान आणि तालिबान संघर्ष , काय आहे नेमके प्रकरण?

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान यु्द्धभूमी बनले असून तालिबानी येथील महत्वाची शहर ताब्यात घेत सुटले आहेत. अफगाणिस्तानातील ६५ टक्के भूभागावर तालिबान्यांनी कब्जा केला आहे. अफगाणिस्तानमधून नाटो सैन्य मागे हटल्यानंतर तालिबानी अधिक आक्रमक झाले आहेत. अफगाणिस्तानी सैनिकही तालिबान्यांपुढे हतबल झाले आहेत.

या युद्धामागचे नेमके कारण काय?

- Advertisement -

अफगाणिस्तान आणि तालिबान्यांमधील रक्तरंजित संघर्षाला २० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. ११ सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉन या इमारतीवर दहशतवाद्यांनी विमान हल्ला केला होता. यात तीन हजार अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा हात असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. त्यावेळी अफगाणिस्तानात कट्टरवादी संघटना तालिबानचे शासन होते. त्यांनीच ओसामा बिन लादेनला अफगाणिस्तानात आश्रय दिला होता. तसेच ओसामाला अमेरिकेच्या ताब्यात देण्यास नकार दिला होता. यामुळे अमेरिका चवताळली होती. ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्याला एक महिना पूर्ण होताच अमेरिकेने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले करत तालिबान आणि अल कायद्याला सळो की पळो केले.

त्यानंतर अफगानिस्तानला तालिबान्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी अमेरिका व इतर देश पुढे सरसावले. नाटो सैनिकांनी तालिबानींना अफगाणिस्तानातून पळवून लावले. यात अनेक तालिबानी पाकिस्तानच्या आश्रयास गेले. पण नंतर ते पुन्हा अफगाणिस्तानात परतले.

- Advertisement -

२००४ साली अफगाणिस्तानात अमेरिकेचे समर्थन असणारे नवीन सरकार बनले. तरी अफगाणिस्तानात तालिबान्यांचे हल्ले सुरूच होते. जे आजपर्यंत सुरूच आहेत. अफगाणिस्तानातील तेल विहीरींवर तलिबान्यांचा डोळा आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचीही नजर या तेल विहीरींकडे आहे.

तालिबान म्हणजे काय?

तलिबान याचा अर्थ विद्यार्थी. १९९० साली तालिबान संघटना ही उत्तर पाकिस्तान आणि दक्षिण पश्चिम अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात आकार घेत होती. भ्रष्टाचार आणि अफगाणि नागरिकांच्या संरक्षणासाठी आम्ही लढत असल्याचे संघटनेचे म्होरके जनतेला सागंत. यामुळे मोठ्य़ा प्रमाणात कट्टरपंथिय तरुण या संघटनेत सामील होत होते. तसेच शरिया कायद्याला प्रोत्साहन देण्याचेही ते कार्य करत होते. इस्लामिक कायद्याप्रमाणे नागरिकांना शिक्षा देणे, हत्या व व्यभिचारासाठी सार्वजनिक ठिकाणी संबंधित आरोपीला फासावर लटकवणे, पुरुषांना दाढी वाढवण्याची सक्ती करणे, महिलांना बुरख्यात वावरण्याची सक्ती करणं तालिबान्यांनी सुरू केलं. तसेच टीव्ही , गाणी आणि सिनेमा यावरही तालिबान्यांनी बंदी घातली होती. मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातली. यामुळे काही कट्टरवादी जनतेने त्यांचे समर्थन केले. तर काहीजणांनी तालिबान्यांविरोधात एल्कार केला. त्यांची तालिबान्यांनी कत्तल केली होती. आज पाकिस्तानच्या मदतीने तालिबानी पुन्हा सक्रिय झाले असून अफगाणिस्तान सरकारही त्यांच्यापुढे हतबल झाले आहे. यामुळे अफगाण सरकारने भारतासह अनेक देशांकडे मदतीची याचना केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -