घरताज्या घडामोडीअफगाणिस्तान १०० तालिबान कैद्यांना सोडणार

अफगाणिस्तान १०० तालिबान कैद्यांना सोडणार

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये शांतता करारानुसार घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये दोन्ही बाजूंकडून कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अफगाणिस्तानाच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानात कैद झालेल्या तालिबान कैद्यांना बुधवारी सोडण्यात येणार आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोडण्यात आलेल्या १०० तालिबान्यांमध्ये १५ कैद्यांचा समावेश नाही ज्यांची सुटका करण्याची मागणी तालिबानने केली होती. बलख प्रांतातील सुरक्षा दलांवर तालिबान्यांनी हल्ला केला आणि त्यात सात अफगाण नागरिक ठार झाले होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. तालिबान्यांनी म्हटले आहे की अमेरिका फेब्रुवारीमध्ये कतारमध्ये झालेल्या कराराचे उल्लंघन करीत आहे. मात्र अमेरिकेने हा दावा फेटाळला आहे.


हेही वाचा – ‘या’ देशात कोरोनाचं औषध म्हणून प्यायले विषारी मद्य; ६०० मृत्यू, ३००० आजारी

अफगाणिस्तानमध्ये शांतता करारानुसार घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये दोन्ही बाजूंकडून कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अफगाण सरकार १०० तालिबान कैद्यांना सोडणार आहे. तर तालिबान २० कैद्यांना सोडणार आहे अलीकडे तालिबानच्या हल्ल्यात २५ अफगाण सैनिक ठार झाले होते. दरम्यान, इस्लामिक देशांच्या संघटना, ओआयसी यांच्यासह संयुक्त राष्ट्रांनी तालिबान्यांना शस्त्रे सोडा आणि शांतता प्रस्थापित करा, असं आवाहन केलं होतं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -