जीव वाचवण्यासाठी काबूलमध्ये नागरिकांची धावाधाव, तालिबान्यांचा बेछूट गोळीबार

काबूल विमानतळावर जमा झालेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यसाठी महिलांवर आणि पुरुषांवर गोळीबार

जीव वाचवण्यासाठी काबूलमध्ये नागरिकांची धावाधाव, तालिबान्यांचा बेछूट गोळीबार

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर झाली आहे. अफगाणी नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी काबूल विमानतळावर धाव घेतली आहे. अफगाणी महिला, मुलं, युवा आणि प्रौढ नागरिकांनी देश सोडण्यसाठी धावाधाव केली आहे. काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी झाली असून या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तालिबान्यांकडून गोळीबार करण्यात येत आहे. तालिबानमध्ये अफगाणी नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन आणि प्रत्युत्तर देत आहे. यामध्ये अनेक नागरिकांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. काबूल विमानतळावर जमललेल्या गर्दीवर गोळीबार करुन तालिबान्यांनी शांती ठेवण्याच्या नियमाच उल्लंघन केलं आहे.

तालिबान्यांनी आश्वासन दिलं होते की, महिलांचा सम्मान करण्यात येईल मात्र याचे तालिबान्यांनी पालन केलं नाही. काबूल विमानतळावर जमा झालेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यसाठी महिलांवर आणि पुरुषांवर गोळीबार करण्यात आला आहे. काबुल विमानतळावरील व्हिडिओ आणि फोटोमध्ये अफगाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसत आहे. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. काबूलमध्ये प्रचंड गर्दी झाल्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तालिबानी बेछूट गोळीबार करत आहेत. काबुलमधून समोर आलेल्या फोटोत स्पष्ट दिसत आहे की, देश सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला आणि लहान मुलांवर धार असलेल्या शस्त्रांनी वार केले आहेत.

तालिबान्यांनी विमानतळावीर गर्दी पांगवण्यासाठी गोळीबार केला यामध्ये अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. काबूलसह अफगाणिस्तानमध्ये असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या शोधात तालिबानी घरोघरी जात आहेत. तालिबानी रस्त्यावर उतरले असून गोळीबार सुरुच ठेवला आहे. रस्त्यावर फिरताना एका महिलेला ठार केलं कारण त्या महिलेनं बुरखा घातला नव्हता तसेच आपलं डोकंही झाकलं नव्हते.

काबूलमध्ये ताबा मिळवल्यानंतर तालिबानने पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी तालिबानकडून सांगण्यात आले की, १९९६ ते २००१ मध्ये असलेल्या नियमांच्या तुलनेत यावेळी नरमाईची भूमिका घेतली आहे. तालिबानचे मुख्य प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिद यांनी म्हटलं आहे की, आम्हाला देशात आणि देशाच्या बाहेरही कोणताही शत्रू नको, महिलांना काम करण्याची आणि शिकण्याची मुभा देण्यात येईल. समाजामध्ये मानाचे स्थान महिलांना मिळेल परंतू शरिया कायद्यानुसार असे तालिबान्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र ही आश्वासनं तालिबान्यांकडून पालन करण्यात येत नाही आहे.


हेही वाचा : Kabul Airport: अमेरिकन सी-१७ विमानाच्या चाकांवर आढळले मानवी अवयवाचे तुकडे