Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Viral Photo: महिला आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना तालिबान्यांनी केली बेदम मारहाण

Viral Photo: महिला आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना तालिबान्यांनी केली बेदम मारहाण

Related Story

- Advertisement -

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांचे (Taliban) सरकार आल्यापासून स्थानिक सामान्य नागरिक भीतीचा सावटाखाली जीवन जगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून काबूलसह (Kabul) वेगवेगळ्या शहरांमध्ये तालिबान सरकार विरोधात आंदोलन सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे या आंदोलनासाठी पुढाकार महिलांनी घेतला आहे. पण या दरम्यान तालिबान आपला खरा चेहरा जगाला दाखवत आहे. आंदोलन करणाऱ्या महिला, सामान्य नागरिक आणि आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांविरोधात तालिबान्यांची क्रूरता समोर आली आहे. महिला आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना बेदम मारहाण केल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Afghan Journalist Beaten By Taliban For Covering Women’s Protests)

काही दिवसांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकारची घोषणा केल्यानंतर विविध ठिकाणी महिला आंदोलन करत आहेत. सरकारमध्ये हिस्सा देण्याची मागणी महिलांकडून केली जात आहे. महिलांच्या या आंदोलनाने तालिबान्यांना हादरून सोडले आहे. यामुळे तालिबान्यांनी आंदोलन करणाऱ्या महिलांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. तसेच उपस्थित पत्रकारांना देखील बेदम मारहाण केली आहे. तालिबान्यांनी बांबू आणि रायफलने महिला आणि पत्रकारांना मारहाण केल्याचे म्हटले जात आहे. तसेच अनेक पत्रकारांना अटक करून त्यांना मारहाण केली जात आहे. आता तालिबान सरकारकडून परवानगीशिवाय कोणतेही आंदोलन करू दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान अफगाणिस्तानमधील महिला आंदोलनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तालिबानचे सरकार आल्यानंतर महिलांवर अनेक निर्बंध लावले जात आहेत. शाळा-कॉलेजमध्ये मुला-मुलींना एकत्र शिक्षण दिले जात नाही आहे. तसेच पेहरावासंदर्भात अनेक निर्बंध लादले आहेत. महिला आता काम करत नाही आहेत. यामुळे सध्या अफगाणिस्तानमध्ये महिला आंदोलन करत आहे. एकीकडे तालिबान्यांनी आपल्या सरकारमध्ये महिलांना हिस्सा देणार असे म्हटले होते, परंतु दुसरीकडे त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत.

- Advertisement -

काबूल व्यतिरिक्त मजार ए शरीफ आणि इतर शहरांमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार आंदोलन झाले आहे. याशिवाय अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील अफगाण नागरिकांनी तालिबान्यांविरोधात आवाज उठवला. अफगाणी नागरिकांमध्ये तालिबान्यांबरोबर पाकिस्तानबद्दलही राग निर्माण झाला आहे. अलीकडेच पाकिस्तानच्या हवाई दलाने पंजशीरच्या भागात ड्रोन हल्ला केला होता.


हेही वाचा – पाकिस्तानने तालिबानचा मार्ग अवलंबला; महिला शिक्षकांना जीन्स घालण्यावर घातली बंदी!


 

- Advertisement -