घरताज्या घडामोडीतालिबान्यांनी दानिश सिद्दीकीचं अपहरण करुन हत्या केली, अफगाण सुरक्षा दलाचा खुलासा

तालिबान्यांनी दानिश सिद्दीकीचं अपहरण करुन हत्या केली, अफगाण सुरक्षा दलाचा खुलासा

Subscribe

दानिश सिद्दिकीसोबत काय करण्यात आले याबाबत साक्षीदार मिळणे कठीण आहे कारण दानिशची हत्या करण्यात आली ते शहर तालिबाण्यांच्या नियंत्रणाखाली

भारतीय पत्रकार आणि फोटोग्राफर दानिश सिद्दीकीचं अफगाणिस्तानमध्ये अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यातील चकमकीत मृत्यू झाल्याची प्रथम माहिती दिली होती. तर काही दिवसांनी दानिशची तालिबाण्यांनी डोकं चिरडल्याची माहिती अफगाण सैन्याकडून देण्यात आली होती. मात्र काही दिवसांपासून दानिशची तालिबाण्यांनी अपहरण करुन हत्या केली असल्याच्या चर्चा सुरु होत्या या चर्चांना अफगाण सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. अफगाण सैन्यासोबत असताना तालिबाण्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात गोळी लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतू या प्रकरणात नव्या नव्या चर्चा सुरु झाल्यानंतर दानिशच्या मृत्यूचा उलगडा होत आहे.

पुलित्झर पुरस्कार विजेते आणि भारतीय फोटोग्राफर असलेले दानिश सिद्दीकी एका खासगी वृत्तवाहिनीसाठी काम करत होते. तालिबाण्यांनी अफगाणमधील केलेल्या घुसखोरी आणि हल्लाबाबत दानिश बातमी वृत्तपत्रांना पुरवत होते. परंतू अफगाण सैन्यासोबत झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. दानिश भारतीय असल्यामुळे तालिबाण्यांनी दानिशचे शीर गाडीच्या चाका खाली चिरडल्याचे अफगाणी सैन्याने सांगितले होते. तर आता दानिशची तालिबाण्यांनी प्रथम अपहरण केलं आणि त्याची हत्या केली असल्याचे फगाण सुरक्षा दलाचे प्रवक्ते अजमल ओमर शीनवारी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दानिशचे अपहरण करुन हत्या करण्यात आली असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून सुरु होत्या या बातम्यांवर अजमल ओमर शीनवारी यांनी दुजोरा दिला आहे. यामुळे दानिशचा मृत्यू झाला नसून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र दानिशच्या मृतदेहासोबत वाईट कृत्य करण्यात आले असल्याचीही माहिती मिळाली आहे. तालिबाण्यांनी भारतीयंचा प्रचंड राग आहे. यामुळे दानिश भारतीय असल्याचे समजताच दानिशचे डोकं चिरडले असल्याची माहिती दिली होती. परंतू दानिशच्या मृतदेहाचे तुकडे केले गेले का? याबाबज अजूनही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार दानिश सिद्दीकीसोबत काय करण्यात आले याबाबत साक्षीदार मिळणे कठीण आहे कारण दानिशची हत्या करण्यात आली ते शहर तालिबाण्यांच्या नियंत्रणाखाली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -