घरताज्या घडामोडीPakistan VS Taliban: पाकिस्तान-तालिबानमध्ये चकमक; पाकिस्तानकडून गोळीबार

Pakistan VS Taliban: पाकिस्तान-तालिबानमध्ये चकमक; पाकिस्तानकडून गोळीबार

Subscribe

पाकिस्तान अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्याच्या आधीपासून तालिबानचे समर्थन करत आहे. परंतु आता पाकिस्तान आणि तालिबानमध्ये फूट पडताना दिसत आहे. तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला दोन्ही देशांच्या सीमेवर सुरक्षा कुंपण बांधण्यापासून रोखले आहे. याबाबत बुधवारी अफगान अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. तसेच यामुळे पाकिस्तानकडून गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. जेव्हा जगभरातील इस्लामिक देश अफगाणिस्तानच्या मानवतावादी आपत्तीवर चर्चा करण्यासाठी इस्लामाबादमध्ये एकत्र आले होते, तेव्हा दोन्ही देशांमधील सीमेवरील वाद चव्हाट्यावर आला.

पाकिस्तानने अफगाणिस्तान सरकारचा विरोध असूनही २,६०० किलोमीटर सीमेचा बहुतांश भाग घेरला. जे क्षेत्र पाकिस्तानने घेरले तिथे पूर्वी ब्रिटिशकालीन सीमांकनालाही आव्हान देण्यात आले होते. दरम्यान असे घेरल्यामुळे दोन्ही बाजूंनी कुटुंबे आणि जमातींचे विभाजन होते.

- Advertisement -

अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्रालय काय म्हणाले?

अफगाण संरक्षण मंत्रालयाकडून सीमा घेरबंदी प्रकाराला बेकायदेशीर म्हटले आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला ख्वारजमी म्हणाले की, तालिबानी सैनिकांनी पाकिस्तान सैनिकांना पूर्व प्रांत नंगरहारमध्ये एक अवैध सीमा घेराबंदी लावण्यास रोखले होते. ही घटना रविवारी घडली होती. दरम्यान आता सीमेवर सामान्य परिस्थिती असल्याचे सांगत सीमेवरील वादाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. तसेच यासंदर्भात पाकिस्तानी लष्कराला विचारले असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

- Advertisement -

सोशल मीडियावर झाले व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांकडून काटेरी तारांचे गठ्ठे जप्त केले. एक वरिष्ठ अधिकारी तैनात पाकिस्तानी सैनिकांना इशारा देताना दिसत आहे की, पुन्हा सीमेवर कुंपण लावण्याचा प्रयत्न करू नये.

तसेच अजून एका व्हिडिओमध्ये तालिबानच्या प्रांतीय गुप्तचर प्रमुखाने पाकिस्तान सैनिकांनी एक सीमा चौकी ताब्यात घेतल्याचे समोर आले. मात्र या व्हिडिओची स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकली नाही. तालिबानचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी सांगितले, ते या घटनेची चौकशी करत आहेत.


हेही वाचा – श्रीनगरमध्ये मोठी दुर्घटना टळली; सुरक्षा दलासोबत घातपात करण्यासाठी ठेवलेले ५ किलो IED जप्त


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -