Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश तालिबानच्या भीतीने २०० अफगाण नागरिकांनी काढला पळ; बेकायदेशीरपणे घुसखोरी केलेल्यांना पाकने केले...

तालिबानच्या भीतीने २०० अफगाण नागरिकांनी काढला पळ; बेकायदेशीरपणे घुसखोरी केलेल्यांना पाकने केले रवाना

Related Story

- Advertisement -

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानात गेलेल्या २०० हून अधिक अफगाणिस्तानातील नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पाकिस्तानचे म्हणणे आहे की, हे सर्वजण त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे घुसले होते. तालिबानने अफगाणिस्तान हस्तगत केल्यानंतर अफगाणिस्तानातून मोठ्या संख्येने लोकांनी पाकिस्तानात पळ काढला. आता पाकिस्तानने बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या अफगाणिस्तान नागरिकांना परत पाठवण्यास सुरूवात केली आहे.

तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर हजारो लोकांना देश सोडून पळून जायचे होते. परंतु ते तेथेच अडकून पडले. विविध भागातून मोठ्या संख्येने लोकांची पाकिस्तानच्या सीमेवर धावाधाव सुरू केली. त्यानंतर कित्येक लोक चमन परिसरात थांबले आणि रेल्वे स्थानकावर आपला वेळ घालवला. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणालाही पुढील भागात प्रवेश करू दिला नाही. काही अफगाण नागरिक क्वेट्टापर्यंत पोहोचले होते, पण पाकिस्तानी पोलिसांनी त्यांना शोधून त्यांना ताब्यात घेतले होते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आता अशा दोनशेपेक्षा जास्त नागरिकांना परत पाठवले आहे, असा DAWN वृत्तपत्राच्या अहवालात दावा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ते बेकायदेशीरपणे पाकिस्तानात दाखल झाले होते, त्यामुळे त्यांना परत पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातून मोठ्या संख्येने लोक पाकिस्तानात आले आहेत, परंतु ज्यांच्याकडे पासपोर्ट, व्हिसा आहे त्यांनाच प्रवेश दिला जात आहे. काही समोर आलेल्या अहवालांनुसार, पाकिस्तानमध्ये साधारण ३ मिलियन अफगाण नागरिक वास्तव्य करतात. केवळ गेल्या वर्षांमध्ये मोठ्या संख्येने लोक येथे पोहोचले आहेत. परंतु, तालिबान राजवट आल्यानंतर काबूल विमानतळावरून मोठ्या संख्येने लोक देश सोडून गेले आहेत. अमेरिकन सैन्याच्या नेतृत्वाखालील बचाव कार्यात दीड लाखांहून अधिक लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर तेव्हापासून काबूल विमानतळ बंद असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -