Afghanistan Crisis: अमेरिकन सैन्य परताच पंजशीरमध्ये तालिबानची घुसखोरी; प्रत्युत्तरात ७ ते ८ तालिबानी ठार

Afghanistan Crisis taliban
तालिबान

अमेरिकन (US) सैन्य अफगाणिस्तानातून (Afghanistan) परताच तालिबानने (taliban) आता खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा सोमवारी रात्री उशीरा अमेरिका काबूलहून (kabul) आपले विमान रवाना करत होते, तेव्हा तालिबान्यांनी पंजशीरमध्ये (panjshir) घुसखोरी केली. यादरम्यान तालिबानचे दहशवाद्यी ठार झाल्याचे समोर आले आहे.

तालिबानी विरोधात लढत असलेल्या नॉर्दर्न अलायन्सने दावा केला आहे की, ‘सोमवारी रात्री तालिबानने पंजशीर खोऱ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार झाला आणि यामध्ये तालिबानचे ७ ते ८ जण ठार झाले आहेत. तसेच त्याचेही दोन सैनिक मार गेले आहेत.’

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे, परंतु अजूनपर्यंत पंजशीरवर तालिबान कब्जा करून शकले नाही आहे. पंजशीरमध्ये अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली नॉर्दर्न अलायन्सने तालिबान विरोधात युद्ध पुकारले आहे.

शेर-ए-पंजशीर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेहच्या अगुवाईमध्ये नॉर्दर्न अलायन्सद्वारे तालिबान विरोधात उभारले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तालिबानने बऱ्याच वेळा पंजशीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळेस तालिबानला अपयश मिळाले. काही दिवसांपूर्वी असा दावा करण्यात आला होता की, तालिबानचे जवळपास ३०० दहशतवादी ठार झाले होते.

दरम्यान दोन्ही बाजूंकडून बातचित केली जात आहे. तालिबान पंजशीरच्या लोकांसोबत चर्चा करत आहे. त्यावेळेस नॉर्दर्न एलायन्सने अहमद मसूद यांनी स्पष्ट केले होते की, ‘तालिबानबरोबर बातचित करण्यासाठी तयार आहे. परंतु जर तालिबानला युद्ध पाहिजे असेल तर युद्ध लढले जाईल.’


हेही वाचा – Afghanistan Crisis: ‘अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची माघार हा जगासाठी एक महत्त्वाचा संदेश’