Afghanistan: काबुलच्या भिंतीवरून महिलांचे चित्र हटवण्यास सुरुवात

Afghanistan Images of women being painted over in Kabul
Afghanistan: काबुलच्या भिंतीवरून महिलांचे चित्र हटवण्यास सुरुवात

तालिबानने अफगाणिस्तानवर (afghanistan taliban) ताबा मिळवण्यानंतर परिस्थिती भयावह झाली आहे. अफगाणिस्तानमधील लोकं सामान न घेता देश सोडून जात आहेत. काबुल (Kabul) विमानतळावर मोठी गर्दी झाली असून लोकं इकडे-तिकडे पळापळ करत आहेत. या गर्दीला रोखण्यासाठी अमेरिकन सैनिकांना हवेत गोळीबार करावा लागला. माहितीनुसार या गोळीबारमध्ये ५ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अशा गंभीर परिस्थितीत काबुलसाठी दिल्लीहून होणारी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आता राजधानी काबुलमधली भिंतीवरील महिल्यांचे चित्र हटवले जात आहे. ट्विटरवर या संदर्भात अनेक फोटो व्हायरल होत आहेत. तालिबान काबुलमध्ये घुसल्यापासून महिलांमध्ये एकच दहशत माजली आहे. सोशल मीडियाद्वारे काबुलमधील महिला मदतीची मागणी करत आहेत.

२००२ सालापूर्वी जेव्हा अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला होता, तेव्हा देशात शरीया कायदा लागू केला होता. या कायद्या अंतर्गत शिक्षा म्हणजे व्यभिचार केला तर दगडफेक करणे, चोरी केली तर हातपाय तोडणे आणि १२ वर्षाखालील वय असलेल्या मुलींना शाळेत जाण्यापासून रोखणे असे यात सामील होते.याबाबत एका तालिबानच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, ‘कोणत्याही गुन्ह्याची शिक्षा देण्याचा निर्णय न्यायालय घेईल.’

माहितीनुसार, तालिबानने अफगाणिस्तानमधल्या ज्या भागांवर ताबा मिळवला आहे, तिथेली महिलांना पुरुषांशिवाय घराबाहेर पडण्यास परवानगी नाही आहे. काही महिला कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे की, त्यांच्या जागी आता पुरुष नोकरी करतील. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, येथील महिलांना बुर्का घालण्यास सांगितले आहे. यापूर्वी एका वृत्तात म्हटले होते की, तालिबानच्या एका प्रवक्ताने वचन घेतले आहे की, दहशतवादी महिला आणि पत्रकारांचा आदर करेल.


हेही वाचा – Afghanistan: काबुलहून भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाची दोन विमानं स्टँडबायवर