Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Afghanistan: अफगाण वंशाच्या भारतीय व्यावसायिकाचे काबूलमध्ये अपहरण

Afghanistan: अफगाण वंशाच्या भारतीय व्यावसायिकाचे काबूलमध्ये अपहरण

Related Story

- Advertisement -

जरी अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान (Taliban) सरकार प्रस्थापित झाले असेल तरी संघर्षमय वातावरण अफगाणिस्तानमध्ये कायम आहे. महिला आंदोलन, तालिबान हिंसाचाराच्या बातम्या अजूनही समोर येत आहेत. आता अफगाणिस्तानमध्ये भारतीय व्यावसायिकाचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. अफगाण वंशाच्या भारतीय नागरिकाचे अपहरण केल्याचे म्हटले जात आहे. (Afghanistan-origin Indian abducted at gunpoint in Kabul)

इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनती सिंह चंढोक म्हणाले की, काबूलमधील अफगाण वंशाच्या एका भारतीय व्यावसायिकाला बंदूकीच्या धाकावर अपहरण केले. त्यांचे नाव बंसरी लाल अरेन्देही आहे. बंसरी शीख समुदायाचे आहे. पण अजूनपर्यंत त्यांचे अपहरण नक्की कोणी केले, हे स्पष्ट झाले नाही आहे. परंतु तालिबान्यांनी त्यांचे अपहरण केल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

चंढोक यांनी पुढे सांगितले की, ५० वर्षांचे बंसरी यांचे काबूलमध्ये औषध उत्पादन करण्याचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांना त्यांच्या दुकानाजवळून अपहरण केले. बंसरीसोबत त्यांच्या स्टाफच्या लोकांचे देखील अपहरण होते. परंतु त्या लोकांनी किडनॅपरच्या तावडीतून पळ काढला आणि स्वतःचा जीव वाचवला. या स्टाफच्या लोकांना बेदम मारहाण केली होती.

चंढोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंसरी यांचे कुटुंबिय दिल्ली-एनसीआरमध्ये राहत आहे. स्थानिक तपास यंत्रणेने त्यांचे अपहरण झाल्याची केस दाखल केली आहे आणि त्यांचा शोध केला जात आहे. तसेच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला याबाबतची माहिती दिली असून सरकारला याप्रकरणी तात्काळ हस्तक्षेप आणि सहकार्य करण्याची विनंती केली.


- Advertisement -

हेही वाचा – सणासुदीत बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळला


 

- Advertisement -