घरदेश-विदेशअफगाणी भाईजानने केला विंग कमांडर अभिनंदनला सलाम

अफगाणी भाईजानने केला विंग कमांडर अभिनंदनला सलाम

Subscribe

भारतीय हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमानच्या शौैऱ्याला देशातीलच नाही तर विदेशातील नागरिकही सलाम करत आहेत. या दरम्यान, अफगाणिस्तानच्या एका नागरिकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय वायूसेनेचे बहादूर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान लवकरच भारतात येणार आहेत. आज दुपारी चार वाजेपर्यंत ते भारतात येणार आहे. दरम्यान, त्यांच्या शौऱ्याला भारतातीलच नाही, तर विदेशातील नागरिकही सलाम करत आहे. विशेष म्हणजे विदेशी नागरिक पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत. अशाच एका विदेशी नागरिकाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा नागरिक अफगाणिस्तानचा आहे. या नागरिकाचे नाव अफगाणी भाईजान असे आहे. त्याने यूट्यूबवर अफगाणी भाईजान नावाचे चॅनल सुरु केलं आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खिल्ली उडवली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने तो व्हिडिओ बनवला होता.

हेही वाचा – पंजाब सीमारेषेवर पाकिस्तानी गुप्तहेराला अटक

- Advertisement -

काय म्हणाला अफगाणी भाईजान?

अफगाणी भाईजानने आपला दुसरा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये तो म्हणतो की, ‘जो आपलं शीर खाली न झुकवता पाकिस्तानात शिरला, असा पहिला माणूस मी पाहिला आहे. हा माणूस नेमकं कोणत्या मातीचा बनला आहे? असा माणूस आमच्या देशात जन्माला यायला हवा होता. त्याच्या डोळ्यात न पाणी आहे, न भीती, दुश्मन देशातही तो स्वत:च्या घरात वावरल्याप्रमाणे राहतो. अशा माणसाला माझा सलाम! ज्या वाघिणीसारख्या मातेने अशा मुलाला जन्म दिला, तिलाही सलाम!’ यासोबतच त्याने पाकिस्तानला सल्ला दिला आहे की, ‘भीक मागून जमवलेले पैसे आत्मघाती हल्लेखोरांवर खर्च करु नका.’

- Advertisement -

हेही वाचा – लादेनच्या मुलावर अमेरिकेने जाहीर केले १ दशलक्ष डॉलरचे इनाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -