घरदेश-विदेशअफगाणिस्तानच्या शाळेत बाॅम्बस्फोट; १० विद्यार्थ्यांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या शाळेत बाॅम्बस्फोट; १० विद्यार्थ्यांचा मृत्यू

Subscribe

जिहादिया शाळेत हा बाॅम्बस्फोट झाला. त्यावेळी प्रार्थना सुरु होती. स्फोटाने आसपासचा परिसर हादरला. जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक पोलीस स्फोटाचा तपास करत आहेत. कोणत्याही अतिरेकी संघटनेने पुढे येऊन या बाॅम्बस्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. विद्यार्थांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

काबुल: सतत अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर राहिलेले अफगाणिस्तान बुधवारी पुन्हा बाॅम्बस्फोटाने हादरले. ऐबक शहारातील एका शाळेत हा बाॅम्बस्फोट झाला. या स्फोटात १६ जण ठार झाले तर २४ जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये १० विद्यार्थी असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

जिहादिया शाळेत हा बाॅम्बस्फोट झाला. त्यावेळी प्रार्थना सुरु होती. स्फोटाने आसपासचा परिसर हादरला. जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक पोलीस स्फोटाचा तपास करत आहेत. कोणत्याही अतिरेकी संघटनेने पुढे येऊन या बाॅम्बस्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. विद्यार्थांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी एका कारचा स्फोट झाला होता. या स्फोटात दोन विद्यार्थांचा मृत्यू झाला होता तर दोघेजण जखमी झाले होते. मात्र हा अतिरेकी हल्ला नव्हता. मुले खेळत असताना कारला अचानक आग लागली. त्यामुळे स्फोट झाला होता, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

३० सप्टेंबर रोजी काबुल येथील एका शैक्षणिक संस्थेत स्फोट झाला होता. या हल्ल्यात १९ जणांचा मृत्यू झाला होता. शैक्षणिक संस्थांमध्ये होणारे बाॅम्बस्फोट हा चितेंचा विषय बनला आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानात अतिरेकी हल्ल्याचे सत्र सुरु असते. तालिबानी राजवट लागू झाल्यानंतर अतिरेकी कारवाया कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र अतिरेकी हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले नाही. जागतिक परिषदेतही अफगाणिस्तानातील दहशतवादावर चिंता व्यक्त करण्यात आली होती. तालिबानी राजवटीने सत्ता हाती घेतल्यानंतर अफगाणिस्तानात अनेक निर्बंध लादले. महिलांसाठी कठोर नियम लागू केले. त्यामुळे येथील नागरिक दहशतीत असतात. अतिरेकी हल्ल्यांमुळेही नागरिक त्रस्त आहेत.

अगाणिस्तानात धार्मिक आधारावर छळ होत असलेल्या अल्पसंख्याकांसाठी मोदी सरकारने अनेकदा चिंता व्यक्त केली होती. सत्ता बदलानंतर तेथील भारतीय नागरिकांना सुरक्षितरित्या मायदेशी आणण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली होती. त्यावेळी मायदेशी परतलेल्या नागरिकांनी मोदी सरकारचे आभार मानले होते.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -