Afghanistan-taliban crisis: अफगाणिस्तावर तालिबानचा ताबा, भारतीय बाजारपेठेवर होणार परिणाम

Afghanistan-taliban crisis Afghanistan Situstion to impact trand with india says exporters
Afghanistan-taliban crisis: अफगाणिस्तावर तालिबानचा ताबा, भारतीय बाजारपेठेवर होणार परिणाम

अफगाणिस्ताची सत्ता आता तालिबानच्या दहशवादी संघटनेने काबीज केली आहे. यामुळे अफगाणिस्तानची एकंदरीत सर्वच परिस्थिती ढवळून निघाली आहे. परिमाणआता भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार संबंधांवरही होणार आहेत. फेडरेशन ऑफ एक्सपोर्ट ऑर्गनायजेशन (FIEO) चे महासंचालक अजय सहाय यांनी सांगितले की, देशांतर्गत निर्यातदारांनी अफगाणिस्तानमधील राजकीय उलथापालथ लक्षात घेऊन सावधगिरी बाळगली पाहिजे. यामुळे व्यापरावर प्रभाव होणार आहे.

अफगाणिस्तानमधील वाढत्या अनिश्चिततेमुळे दोन्ही देशांतील व्यापारात घसरण झाली आहे. मात्र सर्व व्यापार बंद होता कामा नय़े कारण अफगाणिस्तानला भारतीय उत्पादनांची गरज आहे. असे मत FIEO चे माजी अध्यक्ष एस.के.सराफ यांनी व्यक्त केले.

Taliban Afghanistan: अफगाणिस्तानातील ‘तालिबान राज’मुळे पाकला आनंदाच्या उकळ्या

फगाणिस्तानचे भविष्य आता अनिश्चिततेकडे जात आहे. कारण रविवारी तालिबानी दहशतवादी संघटनेने काबुलचा ताबा घेताच राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला. यामुळे अफगाणिस्तानसोबतचा व्यापार निश्चित काळासाठी ठप्प होईल, कारण सध्या अफगाणिस्तानची परिस्थिती निय़ंत्रणाबाहेर गेली आहे.

अफगाणिस्तानमधून भारतात सूखे मनुके, अक्रोड, बदाम, अंजीर, पाइन नट्स, पिस्ता, सुखे जर्दाळू, जर्दाळू, चेरी, खरबूज आणि औषधी वनस्पती इत्यादी गोष्टी आयात होतात. तर भारताकडून या देशात शिपमेंटमध्ये चहा, कॉफी, मिरपूड आणि कापूस निर्यात होतो. परंतु या व्यापारावर आता विपरीत परिणाम होणार आहे. कारण निर्यात केली तरी आर्थिक व्यवहार कसा करायचा असा प्रश्न निर्यातदारांना पडला आहे.


Kabul Airport : काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोळीबारात ५ नागरिकांचा मृत्यू, देश सोडण्यासाठी धडपड