घरदेश-विदेशहोय, मीच श्रद्धाचे तुकडे केले आणि जंगलात फेकले - क्रूरकर्मा आफताबची कबुली

होय, मीच श्रद्धाचे तुकडे केले आणि जंगलात फेकले – क्रूरकर्मा आफताबची कबुली

Subscribe

तुम्ही श्रद्धाची हत्या केली का? याचे उत्तर आफताबने हो, असे दिले. श्रद्धाच्या शरीराचे अवयव जंगलात फेकल्याची आफताबने कबुली दिली. तसेच १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केल्याचे त्याने मान्य केले. श्रद्धाला मारल्याचा पश्चाताप होत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हत्येचा कट आधीच रचल्याचे व त्याच उद्देशाने श्रद्धाला दिल्लीत आणल्याची कबुली आफताबने दिली. श्रद्धाची हत्या केल्याचे घरच्यांना माहिती नव्हते, असेही त्याने पोलिसांना सांगितले.

नवी दिल्ली : श्रद्धा वालकरची हत्या करुन तिचे तुकडे मीच केले, अशी कबुली आरोपी आफताब पूनावालाने दिली. पाॅलिग्राफ चाचणीत आफताबने गुन्हाची कबुली दिली. चाचणीत आफताबला हत्येसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्याची उत्तरे देताना आफताबने गुन्हाची कबुली दिली. गुन्हाची कबुली देत असताना आफताबच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे भय अथवा पश्चाताप नव्हता, अशी माहिती सुत्रांनी दिली.

श्रद्धा वालकरची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. याप्रकरणी दिल्ली पाेलिसांनी आफताबला अटक केली. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली. पोलिसांनी आफताबला घटनास्थळी नेऊन पुरावे शोधण्यास सुरुवात केली. आफताबची पाॅलिग्राफ चाचणी करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी आफताबची चाचणी केली. पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आफताबने अनेक गोष्टींचा उलगडा केला. त्याआधारावर पोलीस आता पुढील तपास करणार आहेत.

- Advertisement -

तुम्ही श्रद्धाची हत्या केली का? याचे उत्तर आफताबने हो, असे दिले. श्रद्धाच्या शरीराचे अवयव जंगलात फेकल्याची आफताबने कबुली दिली. तसेच १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केल्याचे त्याने मान्य केले. श्रद्धाला मारल्याचा पश्चाताप होत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हत्येचा कट आधीच रचल्याचे व त्याच उद्देशाने श्रद्धाला दिल्लीत आणल्याची कबुली आफताबने दिली. श्रद्धाची हत्या केल्याचे घरच्यांना माहिती नव्हते, असेही त्याने पोलिसांना सांगितले. चाचणीचा अहवाल पोलीस तयार करणार आहेत. गुरुवारी १ डिसेंबर रोजी आफताबची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. नार्को चाचणी आधी आफताबची वैद्यकीय चाचणी होणार आहे.

या हत्याकाडांच्या तपासाठी दिल्ली पोलीस वसईत आले होते. दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचे नातलग, मित्र-मैत्रिणी यांची चाैकशी केली. या प्रकरणाचे ड्रग्ज कनेक्शन समाेर आले आहे. आफताब ड्रग्ज घ्यायचा. त्याला ड्रग्ज पुरवणारा गुजरातमधील आरोपी आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. कारागृहात आफताबवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. आफताबवर संतप्त जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे त्याच्या सुरक्षित वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -