हत्येनंतर आफताबने पटवली दुसरी गर्लफ्रेंड; गिफ्टमध्ये दिली श्रद्धाची अंगठी

aftab poonawala gifted shraddhas ring to another girl after murder

श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलीस वेगाने तपास करत आहे. या प्रकरणी मुंबई, दिल्ली, हिमाचल प्रदेश अशा पाच राज्यांमधून पोलिसांनी अनेक पुरावे गोळा केले. सोमवारी पोलिसांनी श्रद्धाच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर काही दिवसात आफताबने डेटिंग ॲपवर एका मुलीशी मैत्री केली होती, यानंतर तिला आफबात घरी घेऊन आला होता. हत्येच्या काही दिवसातचं आफताबने दुसरी गर्लफ्रेंड पटवली होती. इतकचं नाही त्याने या नव्या गर्लफ्रेंडला गिफ्ट म्हणून एक अंगठी भेट दिली होती. जी अंगठी श्रद्धाची असल्याचे बोलले जात आहे. दिल्ली पोलिसांनी ती अंगठी सुद्धा जप्त केली आहे.

दरम्यान आफतबाच्या या दुसऱ्या गर्लफ्रेंडचीही दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. ही मुलगी पेशाने डॉक्टर असल्याचे बोलले जात आहे. श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब पूनावाला याला 12 नोव्हेंबरला अटक केली. दिल्लीच्या महरोलीमध्ये श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने ज्या डेटिंग ॲपवरून दुसरी गर्लफ्रेंड पटवली, त्याच ॲपवरून त्याची श्रद्धा वालकरशी फ्रेंडशीप झाली होती. दरम्यान आफताबने श्रद्धाच्या हत्येनंतर या गर्लफ्रेंडलाही त्याने घरी बोलावले होते. धक्कादायक म्हणजे आफताबची दुसरी गर्लफ्रेंड जेव्हा घरी त्यावेळी श्रद्धाच्या मृतदेहाची तुकडे फ्रीजमध्ये आणि घरातील वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले होते.

आफताब सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगतोय. सोमवारी त्याला तिहार तुरुंगातून पॉलीग्राफ चाचणीसाठी रोहिणी येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये (एफएसएल) आणण्यात आले. आफताबच्या आतापर्यंत 3 पॉलीग्राफ चाचण्या झाल्या आहेत. यापूर्वी शुक्रवारी त्यांची शेवटची चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये तापामुळे चाचणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.


आफताबला कोर्टात घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला, पोलिसांकडून हवेत गोळीबार