घरताज्या घडामोडीश्रद्धा हत्या प्रकरण : आफताबच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ, नार्को टेस्टला मंजुरी

श्रद्धा हत्या प्रकरण : आफताबच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ, नार्को टेस्टला मंजुरी

Subscribe

श्रद्धा हत्याकांड प्रकरणातील नवीन खुलासे समोर येत आहेत. वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकरची १८ मे रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे दिल्लीतील जंगलात फेकल्याची कबुली तिचा लिव्ह इन पार्टनर आरोपी आफताब अमीन पूनावाला याने दिली आहे. आफताबला आज दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले असता वकिलांनी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. वकिलांनी दिल्ली न्यायालयाबाहेर एकच गोंधळ घातला होता. परंतु आफताबच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ करण्यात आली असून नार्को टेस्टला मंजूरी देण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांना आफताबला उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात घेऊन जायचे आहे. श्रद्धा आणि आफताब हे दोघं या दोन्ही ठिकाणी गेले होते. पोलिसांना अद्यापही श्रद्धाचं शीर, मोबाईल आणि हत्येत वापरलेले हत्यार सापडलेले नाही. पोलीस त्याचा सातत्याने शोध घेत आहेत. आफताब सतत आपली विधानं बदलत असल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. श्रद्धा त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी दबाव आणत होती त्यामुळे त्याने तिची हत्या केली, असं आफताबने पोलिसांना सांगितले. तर कधी कधी फोनवर बोलत असताना श्रद्धा त्याच्यावर नेहमी संशय घ्यायची आणि यावरून दोघांमध्ये भांडणही व्हायचे, असंही स्टेटमेंट आफताबने पोलिसांना दिल्याचं सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

आफताबचा तुरूंगातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये आफताब जमिनीवर शांतपणे झोपलेला पहायला मिळत आहे. इतकी शांत झोप कशी काय लागू शकते?, असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर आफताब एकदाच रडला होता. त्यानंतर त्याचे वडील अमीन पुनावाला हे देखील त्याच्या भेटीसाठी कोठडीत गेले होते.

कशी असते नार्को टेस्ट?

- Advertisement -

कुठल्याही गुन्ह्यात जेव्हा पुराव्यांचा अभाव असतो त्यावेळी तपास संस्था नार्को टेस्टची मदत घेते. यात आरोपीला एक सायकोअॅक्टिव्ह औषध दिले जाते. तर काही वेळा सोडीयम पेंटोथोलचे इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर अर्धवट शुद्धीत असलेल्या आरोपीची चौकशी करून त्याने केलेल्या गुन्ह्याचा छडा तोच सांगू लागतो. या टेस्ट वेळी मानसोपचारतज्ज्ञ, डॉक्टर आणि पोलीस अधिकारी फॉरेंसिक तज्ज्ञ उपस्थित असतात.


हेही वाचा : श्रद्धाचे मुंडकेच सापडेना, आफताब करतोय पोलिसांची दिशाभूल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -