२०२४ च्या निवडणुकीनंतर भाजप भारतीय राज्यघटनाच बरखास्त करेल, मुफ्तींचा गंभीर आरोप

mehbooba mufti

काश्मीरमधील Peoples Domecratic Party पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजप काश्मीरला प्रयोगशाळा बनवू पाहात आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच, २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपा राज्यघटनाच बरखास्त करून संपूर्ण हिंदू राष्ट्र घडवेल असा आरोपही केला आहे. राज्यात तैनात असलेल्या सशस्त्र दलातील जवानांपासून ते अधिका-यांपर्यंत प्रत्येकजण मतदार यादीत नाव समाविष्ट करून मतदान करू शकणार आहे, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलंय. त्याचा संदर्भ घेत मुफ्ती यांनी हे विधान केलंय. (After 2024 elections, BJP will destroy the Indian Constitution, Mufti’s serious charge)

हेही वाचा – गैर-काश्मिरींना मतदानाचा अधिकार; भाजपला निवडणुकांवर प्रभाव टाकायचा असल्याची विरोधकांची टीका

जम्मू आणि काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी हिरदेश कुमार यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की निवडणुकीपूर्वी या प्रदेशात 20 लाखांहून अधिक नवीन मतदारांनी नोंदणी करणे अपेक्षित आहे. यासह, मतदारांची संख्या एक तृतीयांशपेक्षा जास्त वाढू शकते, ज्यामुळे परिसरातील 76 लाख मतदारांची सध्याची संख्या वाढेल. कुमार म्हणाले, आम्ही 20-25 लाख नवीन मतदार (गैर-काश्मीरींसह) अंतिम यादीत समाविष्ट होण्याची अपेक्षा करत आहोत. यावरून विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“२०१९ च्या निवडणुकीनंतर मोदी सरकारने आमच्या राज्यावर अन्याय केला आहे. ३७० कलम रद्द केला, ध्वज आमच्याकडून काढून घेण्यात आला. त्यांचे इरादे चांगले नाहीत. २०२४ च्या निवडणुकीनंतर ते देशाची राज्यघटनाही रद्द करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना भारत देशाला हिंदुत्ववादी आणि भाजपचं राष्ट्र बनवायचं आहे. भाजप सगळीकडे आमदार फोडून सरकार बनवत आहे. काश्मीरमध्ये लोकशाही संपवली जातेय. भाजप सध्या काश्मीरला प्रयोगशाळा बनवू पाहतंय. मात्र तसं करता कामा नये,’ असा हल्लाबोल मेहबुबा मुफ्ती यांनी केला.

हेही वाचा – ‘वंदे मातरम’ला ‘या’ मुस्लीम संघटनांचा पाठिंबा; पाकिस्तान समर्थकांवर कारवाईची मागणी

भाजपचा पलटवार

मेहबुबा मुफ्ती दुसऱ्या युगात जगत आहेत, असं प्रत्युत्तर भाजपने दिलं आहे. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानी मतदारांचा समावेश होता, असा प्रतिहल्ला भाजपकडून करण्यात आलाय.