घरदेश-विदेशAmul नंतर आता Mother Dairy चा ग्राहकांना झटका; दुध प्रति लिटर 2...

Amul नंतर आता Mother Dairy चा ग्राहकांना झटका; दुध प्रति लिटर 2 रुपयांनी महाग

Subscribe

दिवाळीपूर्वी आता सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा आणखी एक झटका सहन करावा लागणार आहे. अमूलनंतर आता मदर डेअरी कंपनीनेही दुधाचे दरात वाढ केली आहे. मदर डेअरीने फुल क्रीम दूध आणि गायीच्या दुधाच्या दरात प्रति लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे.

मदर डेअरीच्या प्रवक्त्याने शनिवारी सांगितले की, कंपनीने फक्त फुल क्रीम आणि गाईच्या दुधाच्या व्हेरियंटच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ उद्यापासून म्हणजेच 16 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल.

- Advertisement -

अमूलनेही केली दरवाढ

यापूर्वी अमूल ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या GCMMF ने अमूल गोल्ड आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये वाढ जाहीर केली होती. यावर गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (जीसीएमएमएफ) एमडी आरएस सोधी म्हणाले की, अमूल गोल्ड आणि म्हशीच्या दुधात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गुजरात वगळता देशातील सर्व बाजारपेठांमध्ये ही दरवाढ करण्यात आली आहे. फॅटचे दर वाढल्याने या उत्पादनांच्या किमती वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


बँक अकाऊंट ओपन करणे होणार सोप्पे; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे उद्धाटन


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -