घरताज्या घडामोडीपबजीसह ११८ चीनी Apps बंदीनंतर ड्रॅगनने दिली 'ही' प्रतिक्रिया

पबजीसह ११८ चीनी Apps बंदीनंतर ड्रॅगनने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Subscribe

केंद्र सरकारने पबजीसह चीनच्या ११८ अ‍ॅप्सवरही बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने निषेध करत चिंता व्यक्त केली आहे. चीनचे वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते गाओ फेंग म्हणाले की, ‘भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचा गैरवापर करून चीनी कंपनींवर अंधाधुंदी बंदी घालत आहे.’

ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार गाओ यांनी भारताच्या या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. भारत-चीन या दोन्ही देशांना आर्थिक आणि व्यावसायिक सहकार्याचा फायदा होईल असे गाओ यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

ते म्हणाले की, ‘चीन नेहमीच परदेशात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना संबंधित देशांच्या स्थानिक कायद्यांचा पालन करण्याचे निर्देश देते. भारत दोन्ही देशांमधील मेहनती झालेले द्विपक्षीय संबंध टिकवून ठेवण्यासाठी चीनबरोबर मिळून काम करेल, अशी आम्हाला आशा आहे. यामुळे दोन्ही देशांच्या कंपन्या, गुंतवणूकदार आणि सेवा प्रदात्यांना काम करण्यासाठी खुले आणि निष्पक्ष वातावरण तयार होण्यास मदत होईल.’

उत्तर लडाखमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तसेच चीनने केलेल्या घुसखोरीवर उत्तर देताना भारताने गेमिंग अ‍ॅप पबजीसह ११८ चीन अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. हे अ‍ॅप्स देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात असे भारताचे म्हणणे आहे. यापूर्वी दोनदा भारताने चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. देशाची सुरक्षा, अखंडतासाठी या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे म्हणणे आहे.

- Advertisement -

यापूर्वी १५ जून रोजी सरकारने ५९ चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. यात टिकटॉक आणि यूसी ब्राउझरसारखे लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश होता. त्यानंतर ४७ अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. मग आता तिसऱ्या वेळी १८८ अ‍ॅप्सवर बंदी घालून भारताने चीनला मोठा आर्थिक झटका दिला.


हेही वाचा – कोण म्हणतं PUBG बॅन झाला; या चोर मार्गाने आताही खेळू शकता PUBG!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -