घरदेश-विदेशकर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध; 'ही' आहेत महत्त्वाची आश्वासने

कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध; ‘ही’ आहेत महत्त्वाची आश्वासने

Subscribe

मुंबई | कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीला (Karnataka Assembly Election) अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या प्रचाराने जोर धरला आहे. नुकताच भाजपने जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध केला आहे. यात भाजपने (BJP) हिंदुत्वावादाचा मुद्दा आणि समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर काँग्रेसने देखील त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करत भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटकात काँग्रेसची सरकार आल्यानंतर बजरंग दलावर बंदी (Bajrang Dal) घालण्याचे आश्वासन त्यांनी त्यांच्या जाहरीनाम्यातून दिली आहे.

या निवडणुकीत भाजपला विरोधी वातावरणाचा सामना करावा लागणार आहे. कारण, कर्नाटकात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. यामुळे भाजपला निवडणुकीत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक शाखा असलेल्या बजरंग दलावर बंदी घाल्याचे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

तसेच काँग्रेस बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टरपंथी संघटनेशी केली आहे. ज्या संघटना समाजामध्ये जाती आणि धर्माचे द्वेष पसरवण्याचे काम करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. काँग्रेसचे सरकार आल्यावर त्या कट्टरपंथी संघटनांवर बंदी घालण्यात येईल. बजरंग दल आणि पीएफआय या संघटना परस्पर शत्रुत्व आणि द्वेषभावना वाढवितात. या संघटनांवर बंदी घालून कारवाई केली जाईल, असे काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यातून नमूद केले आहे.

‘ही’ आहेत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पाच प्रमुख आश्वासने

- Advertisement -
  • बजरंग दलावर बंदी घालणार
  • प्रत्येक कुटुंबाला २०० युनिटपर्यंत मोफत वीज
  • प्रत्येक गरीब कुटुंबाला दरमहा १० किलो रेशन
  • कुटुंबातील महिला प्रमुखांला दरमहा २ हजार रुपये देणार
  • युवा निधीच्या माध्यमातून बेरोजगार पदवीधर तरुणांना ३ हजार रुपये व पदविकाधारकांना दीड हजार रुपये देणार

हेही वाचा – अर्धा लिटर नंदिनी दूध आणि 3 मोफत गॅस सिलिंडर; भाजपचे कर्नाटकच्या जनतेला आश्वासन

भाजपचा जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने

  • बीपीएल कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध आणि दर महिन्याला पाच किलो धान्याचे किट
  •  दारिद्य रेषेखालील कुटुंबांना दरवर्षी उगादी, गणेश चतुर्थी आणि दिवाळीला तीन गॅस सिलेंडर
  • समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासन
  • वोक्कलिंगा आणि लिंगायत या समाजाला दोन टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन
  •  महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात स्वस्त, दर्जेदार आणि सकस आहार देण्यासाठी अटल आहार केंद्र
  • कुटुंबातील पाच महिलांसाठी प्रति वर्ष १०,००० रुपयांची एफडी करण्याचं आश्वासन
  •  निराधारांसाठी १० लाख घरे
  •  ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -