घर देश-विदेश चांद्रयान-3 नंतर Aditya-L1 ची यशस्वी घोडदौड सुरू; यशस्वीरित्या बदलली दुसरी कक्षा

चांद्रयान-3 नंतर Aditya-L1 ची यशस्वी घोडदौड सुरू; यशस्वीरित्या बदलली दुसरी कक्षा

Subscribe

भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेतील आदित्य L-1 उपग्रहाने पृथ्वीच्या कक्षा बदलाचा दुसरा टप्पा पूर्ण केला आहे.

बंगळुरू: भारताने यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर पाऊल ठेवल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. अशातच आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी आदित्य L-1 नावाचे अवकाश यानसुद्धा यशस्वीरित्या प्रक्षेपित केले असून, त्यांने आता पृथ्वीची दुसरी कक्षाही यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याची माहिती इस्रोने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.(After Chandrayaan-3, Aditya-L1’s successful run begins; Successfully replaced another chamber)

भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेतील आदित्य L-1 उपग्रहाने पृथ्वीच्या कक्षा बदलाचा दुसरा टप्पा पूर्ण केला आहे. इस्रोने (ISRO) ने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, आदित्य L-1 च्या पृथ्वी कक्षा बदलाचा दुसरा टप्पा बंगळुरूमधील इस्ट्रॅक (ISTRAC) केंद्रातून यशस्वीरित्या पार पडला. या ऑपरेशन दरम्यान मॉरिशस, बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअर येथील इस्ट्रॅक्ट (ISTRAC), इस्रो (ISRO) ग्राउंड स्टेशनने उपग्रहाचा मागोवा घेतला.

- Advertisement -

हेही वाचा : मराठा आरक्षण आंदोलनाचा एसटीला फटका; 20 बसेस जाळल्या, 46 डेपोमधील सेवा बंद, कोटींचे नुकसान

इस्रोने पुढे माहिती दिली आहे की, आता आदित्य L-1 ची नवीन कक्षा 282 किमी आहे. पुढील तृतीय श्रेणी बदलाची प्रक्रिया 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 वाजता केला जाणार आहे. यापूर्वी 3 सप्टेंबर रोजी आदित्य एल-1 ने यशस्वीरित्या कक्षा बदलली होती. त्याला पृथ्वीच्या कक्षेत ठेवण्यात आले होते. इस्रोने रविवारी सकाळी 11.45 वाजता आदित्य एल-1 चे पहिले पृथ्वी बाउंड फायरिंग केले, ज्याच्या मदतीने आदित्य एल-1 ने आपली कक्षा बदलली. इस्रोने शनिवारी पीएसएलव्ही (PSLV) सी-57 (C57) प्रक्षेपण वाहनातून आदित्य L-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण झाले. चांद्रयान-3 प्रमाणेच हे मिशन प्रथम पृथ्वीभोवती फिरेल आणि नंतर ते वेगाने सूर्याकडे झेपावणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शी जिनपिंग यांची जी-२० शिखर परिषदेला बगल

पृथ्वीच्या कक्षेत 16 दिवस राहणार आदित्य एल-1

इस्रोने याबाबतीत माहिती दिली की, आदित्य एल-1 ने आपली कक्षा बदलली असून, त्याने पुढील कक्षेत प्रवेश केला आहे. आदित्य एल-1 पृथ्वीच्या कक्षेत पुढील 16 दिवस राहणार आहेत. या दरम्यान पाचवेळा याची कक्षा बदलली जाणार आहे.

आदित्य L-1 110 दिवसांनंतर गाठणार लक्ष

110 दिवसांच्या प्रवासानंतर आदित्य L-1 लार्जिंग बिंदूवर पोहोचेल. लार्जिंग-1 बिंदूवर पोहोचल्यानंतर, आदित्य एल- 1 मध्ये आणखी एक युक्ती केली जाईल, ज्याच्या मदतीने आदित्य L-1 ला L-1 पॉइंटच्या प्रभामंडल कक्षेत स्थापित केले जाणार. येथून आदित्य L-1 सूर्याचा अभ्यास करेल. हा लार्जिंग बिंदू सूर्याच्या दिशेने पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. आदित्य एल-1 सोबत सात पेलोड पाठवण्यात आले आहेत, जे सूर्याचा तपशीलवार अभ्यास करणार आहेत. यापैकी चार पेलोड सूर्यप्रकाशाचा अभ्यास करतील. उर्वरित तीन सूर्याच्या प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणार आहेत.

- Advertisment -