Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Chandrayaan-3 च्या यशानंतर पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेत ठरले आकर्षणाचे केंद्र; जागतिक नेत्यांनी...

Chandrayaan-3 च्या यशानंतर पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेत ठरले आकर्षणाचे केंद्र; जागतिक नेत्यांनी केले अभिनंदन

Subscribe

Chandrayaan-3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील ‘चांद्रयान-3’ (Chandrayan 3) चे विक्रम लँडर बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. यासह भारत (India) हा पराक्रम करणारा जगातील चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. ‘चांद्रयान-3’ चे सॉफ्ट लँडिंग होताच देशभरात आनंद साजरा करण्यात आला. जगभरातील नेत्यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. (After Chandrayaan 3 success PM Modi becomes center of attraction at BRICS summit World leaders congratulated)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या हे ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी (23 ऑगस्ट) ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान एका मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान मोदी हे आकर्षणाचे केंद्र ठरले. यावेळी जगभरातील नेत्यांनी पंतप्रधान मोदींना भेटून ‘चांद्रयान-3’ मिशनच्या यशाबद्दल त्यांना शुभेच्छा देतना अभिनंदन केले. यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचाही सहभाग होता.

- Advertisement -

‘चांद्रयान-3’ च्या यशानंतर जगभरातील भारतीयांमध्येही उत्साह

‘चांद्रयान-3’ मोहिमेच्या यशामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्वत: खूप उत्साहित दिसत होते. मिशनच्या यशाबद्दल दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या समुदायाच्या उत्साहाचेही त्यांनी कौतुक केले. जोहान्सबर्गमध्येही ‘चांद्रयान-3’ च्या यशाचा उत्साह दिसत असल्याचे त्यांनी ट्वीट केले. मोदींनी ट्वीट करताना म्हटले की, भारताच्या यशाबद्दल दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या समुदायाचा उत्साह पाहून आनंद झाला. जोहान्सबर्गमधील एका हॉटेलमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना भेटताना पंतप्रधानांनी त्यांचे फोटो ट्वीट केले आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी फोनवरून इस्रोच्या अध्यक्षांचे केले अभिनंदन

‘चांद्रयान-3’ मोहीम 14 जुलै 2023 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आली. काल (23 ऑगस्ट) ‘चांद्रयान-3’ मोहिमेचे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच देशभरात आनंद साजरा करण्यात आला. भारताच्या या विशेष कामगिरीची जगभरातही चर्चा झाली. मिशनच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोहान्सबर्ग येथून इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांना फोन केला आणि मिशनच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मोदी म्हणाले की, शक्य झाल्यास लवकरच ते इस्रोच्या मुख्यालयात येतील आणि संपूर्ण टीमला भेटतील.

भारताने इतिहास रचला

भारतीय अंतराळ संस्था इस्रोची ‘चांद्रयान-3’ मोहीम बुधवारी यशस्वी पार पडली. मिशनचे लँडर विक्रम यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आणि त्यानंतर रोव्हर प्रग्यान देखील लँडर विक्रममधून यशस्वीपणे बाहेर काढले आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला आहे.

 

- Advertisment -