घरदेश-विदेशकोरोनानंतर जगाने 'या' भयंकर आजारासाठी तयार राहावे; WHO प्रमुखांचा इशारा

कोरोनानंतर जगाने ‘या’ भयंकर आजारासाठी तयार राहावे; WHO प्रमुखांचा इशारा

Subscribe

नवी दिल्ली : सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाली असून रुग्ण मिळणेही कमी झाले आहे. असे असताना जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रॉस अधानोम गेब्रियेसस (Dr. Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी कोरोनापेक्षा भयंकर आजारासाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना कोरोनाचा नवीन व्हेरिएंट येण्याची भीतीही व्यक्त केली आहे. (WHO chief’s warning After Corona, the world should be prepared for terrible disease)

जिनिव्हामध्ये आयोजित हेल्थ असेम्ब्लीसमोर बोलताना टेड्रॉस म्हणाले की, कोविडनंतर आणखी एका भयंकर आजाराचा धोका जगाला असू शकतो आणि यामध्ये मृत्यूची संख्याही मोठी असेल. त्यामुळे नवी महासाथ येण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे जगाने तयार राहावे आणि कोणत्याही प्रकारच्या धोक्याला सामोरे जाण्यास आम्ही बांधील आहोत, असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत करोनाने जगामध्ये हाहाकार माजवला होता. या महामारीमध्ये 70 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असली तरी हा आकडा किमान २ कोटी इतका आकडा असल्याचे टेड्रॉस यांनी सांगितले.

- Advertisement -

टेड्रॉस म्हणाले की, WHO ने सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका असणारे नऊ प्राथमिक आजार ओळखले आहेत. त्यांच्या उपचारांच्या अभावामुळे किंवा त्यांच्या साथीच्या रोगास कारणीभूत होण्याच्या संभाव्यतेमुळे ते सर्वात धोकादायक मानले गेले आहे. शतकातील सर्वात गंभीर आरोग्य संकट म्हणून समोर आलेल्या कोविड-19 महामारीच्या आगमनासाठी जग तयार नव्हते, असे टेड्रॉस यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, करोनासंदर्भात बोलताना टेड्रॉस म्हणाले की, जे बदल व्हायला हवेत ते आम्ही केले नाहीत तर कोण करणार? जर आपण आत्ताच बदल केले नाहीत, तर मग कधी करणार? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी सांगितले की, पुढची महामारी दार ठोठावत आहे. तिचा सक्षमपणे सामना करण्यासाठी आपण तयार राहायला हवे, असेही टेड्रॉस यांनी हेल्थ असेम्ब्ली परिषदेत नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -