घरताज्या घडामोडीपुन्हा डिझेल महागले, 'हे' आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर!

पुन्हा डिझेल महागले, ‘हे’ आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर!

Subscribe

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पेट्रोल – डिझेलच्या भावात सतत वाढ होत आहे. सलग २० ते २२ दिवस सातत्याने पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी डिझेलच्या दरात १३ पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे आता डिझेलचा भावाने नका उच्चांक गाठला आहे. दिल्लीत डिझेल ८१.१८ रुपये तर मुंबईत ७९.४० रुपयावर पोहचले आहे.

या आधी सोमवारी डिझेलमध्ये ११ पैशांनी वाढ केली होती. त्यानंतर आज पुन्हा कंपन्यांनी डिझेलच्या दरात वाढ केली आहे.  इंडियन ऑइलच्या पत्रकानुसार बुधवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.१९ रूपये आहे तर दिल्लीत ८१.१८ रुपये असून पेट्रोल ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. तर कोलकत्त्यात पेट्रोल ८२. १० रूपये तर डिझेल ७६.३३ रूपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ८३.६३ रुपये असून डिझेल दर ७८.२२ रुपयांवर कायम आहे. मे महिन्याच्या तुलनेत त्यात ११ टक्के वाढ झाली. मात्र गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत अजूनही इंधन विक्री ७.९ टक्के कमीच आहे.

- Advertisement -

२०१० पासून दर नियंत्रणमुक्त

२०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. यात झालेलं नसून भरून काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मागील महिनाभर पेट्रोल आणि डिझेल दर वाढवले. गेल्या महिन्याभरात २१ वेळा पेट्रोल आणि २३ वेळा डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.


हे ही वाचा – केतकीच्या ‘त्या’ पोस्टवर, शिवसेनेच्या नेत्याकडून धमकी!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -