घरताज्या घडामोडीत्रिपुरा विधानसभा निवडणूक : काँग्रेस-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट; अनेक जण जखमी

त्रिपुरा विधानसभा निवडणूक : काँग्रेस-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट; अनेक जण जखमी

Subscribe

त्रिपुरातील मजलिसपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर येत आहे. कार्यकर्त्यांच्या झटापटीत अनेक जण जखमी झाले आहेत. निवडणूक आयोगाने त्रिपुरा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

त्रिपुरातील मजलिसपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर येत आहे. कार्यकर्त्यांच्या झटापटीत अनेक जण जखमी झाले आहेत. निवडणूक आयोगाने त्रिपुरा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. (after election dates announced in tripura clash between bjp and congress supporters)

मिळालेल्या माहितीनुसार, मजलिसपूर मतदारसंघातील रानीरबाजार मोहनपूर भागात भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यामध्ये काँग्रेस नेते डॉ. अजय कुमार जखमी झाले आहेत.

- Advertisement -

या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार सुदीप राय बर्मन यांनी विरोधकांवर हल्ला करण्यात एक मंत्री नेतृत्व करत असल्याचा आरोप केला. शिवाय, “जखमी झालेले अनेक कार्यकर्ते अजूनही रानीरबाजार पोलीस ठाण्यात आहेत. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असल्याने त्यांना रुग्णालयात पाठवता आले नाही”, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, राय बर्मन यांनी निवडणूक आयोगाने मजलिसपूरसह पाच विधानसभा जागांसाठी स्वतंत्र निवडणुका घेण्याची मागणी केली. महत्त्वाचे म्हणजे त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत, तर मतमोजणी 2 मार्चला होणार आहे.

- Advertisement -

त्रिपुरासोबतच नागालँड आणि मेघालयच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. या दोन राज्यांमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांमध्ये 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसोबतच तिन्ही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे.

नागालँड विधानसभेची मुदत 12 मार्च रोजी संपत आहे. तर मेघालय आणि त्रिपुरा विधानसभेची मुदत अनुक्रमे 15 आणि 22 मार्च रोजी संपत आहे. तीन राज्यांच्या विधानसभेत 60-60 जागा आहेत. त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार आहे, तर नागालँडमध्ये राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीची सत्ता आहे. मेघालयात नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) चे राज्य आहे.


हेही वाचा – त्रिपुरा, मेघालय, नागालँड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा; ‘या’ तारखेला होणार मतदान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -