घरटेक-वेकगूगलनंतर जगभरात ट्विटर डाऊन, नेटकरी त्रस्त

गूगलनंतर जगभरात ट्विटर डाऊन, नेटकरी त्रस्त

Subscribe

मंगळवारी सकाळच्या सुमारास काही काळासाठी गुगले सर्च इंजिन काही काळासाठी डाऊन झाले होते. त्यानंतर ट्विटर डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्विटर डाऊन झाल्याने युजर्सला तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला.

मंगळवारी सकाळच्या सुमारास काही काळासाठी गुगले सर्च इंजिन काही काळासाठी डाऊन झाले होते. त्यानंतर ट्विटर डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्विटर डाऊन झाल्याने युजर्सला तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. तसेच, याशिवाय डाउन डिटेक्टर वेबसाइटवर (Down Detector Website) ट्विटर डाऊन झाल्याचे हजारो रिपोर्ट्स आले होते, कारण हजारो युजर्सला ट्विटर वापरताना अडचणी येत होत्या. त्यात त्यांनी केवळ पॉप अप नोटीस दिसत होती. त्यामुळं संतापलेल्या अनेक युजर्सनी कंपनीकडे या गैरसोयीबद्दल तक्रार केली. त्यानंतर कंपनीने युजर्सच्या या तक्रारींची दखल घेत ट्विटर डाऊन झाल्याचे मान्य केले. (After google twitter server down in world)

मिळालेल्या महितीनुसार, जगभराच ठप्प असलेली ट्विटरची सेवा तब्बल ३० मिनिटांनंतर पूर्ववत करण्यात आली. त्यानंतर कंपनीने याबाबत एका पोस्टच्या माध्यमातून युजर्सना माहिती दिली. “आम्ही ट्विटरमध्ये येणारी समस्या सोडवली आहे, ट्विटरच्या अंतर्गत प्रणालीत जो बदल करायचा होता, तो झाला नाही, परंतु आता ट्विटरची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे”, असे कंपनीने म्हटले होते.

- Advertisement -

जगभरात मत मांडण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी सर्वात लोकप्रिय ठरलेलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ट्विटरला ओळखले जाते. मात्र, मागील काही काळात अनेकदा ट्विटर डाऊन झाल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यातही सुमारे तासभर ट्विटर डाऊन होतं. याआधी 17 फेब्रुवारीलाही युजर्सना अशाच समस्यांना सामोरे जावे लागले होते.

गूगलही डाऊन

- Advertisement -

मंगळवारी सकाळी काही मिनिटांसाठी डाऊन झाले होते. गूगल डाऊन झाल्याचे समजताच कंपनीनंही तात्काळ कारवाई करत तातडीने गूगलची सेवा पुन्हा सुरू केली. परंतु गूगल का डाऊन झाले होते, याचे कारण अजून समोर आलेले नाही. दरम्यान, गूगल डाऊन झाले त्यावेळी अनेक युजर्सना सर्च करताना समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यावेळी युजर्सना स्क्रिनवर 500 That’s an error मेसेज दिसत होता. गूगल युजर्स वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सर्च करताना येणाऱ्या एररचे स्क्रिनशॉर्ट्स शेअर केले.


हेही वाचा – गूगलची सेवा डाऊन; सोशल मीडियावर स्क्रीनशॉटचा वर्षाव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -